E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
खटावमधील पिके पावसाअभावी कोमेजू लागली
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
बळीराजा चिंतेत; सोयाबीन, घेवड्याला पाण्याची गरज
सातारा, (प्रतिनिधी) : खरीप हंगामातील सोयाबीन व घेवड्याचे पीक सध्या शेंगा भरण्याच्या टप्प्यात आले आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांची चिंता अधिक वाढली आहे. पावसाअभावी पिके कोमेजू लागली असून, आगामी काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.
खटाव तालुक्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीन, घेवडा यासह विविध पिकांची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण व वाढ चांगली झाली. मात्र, सध्या पिकांना शेंगा भरण्यासाठी पाण्याची गरज आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतकर्यांसमोर संकट उभे राहिले आहे.
सोयाबीनला शेंगा लागल्या असून, त्या भरण्याच्या अवस्थेत आहेत. घेवड्याचीही अवस्था तशीच आहे. मात्र, जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने पिकांची पाने कोमेजू लागली आहेत. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडू लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पिकांची वाढही खुंटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
पिकांना सध्या पाण्याची गरज आहे. पुढील काही दिवसांत चांगला पाऊस झाल्यास पिकांना मोठा आधार मिळू शकेल. त्यामुळे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला आता दमदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. शेंगा भरण्याच्या काळात पाऊस मिळाला, तरच उत्पादनाची आशा आहे. मात्र, पावसाने आणखी ओढ दिल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी भावना शेतकर्यांमधून व्यक्त होत आहे.
खटाव तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या कुटुंबाचे वर्षभराचे आर्थिक नियोजन खरीप हंगामातील उत्पादनावर अवलंबून असते. शेतीतील उत्पन्नातून कर्जफेड, मुलांचे शिक्षण, घरखर्च तसेच पुढील हंगामाची तयारी केली जाते. त्यामुळे ऐन उत्पादनाच्या टप्प्यावर पावसाने ओढ दिल्याने शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
Related
Articles
दोन महिने होऊन गेले तरी कचर्याचा प्रश्न कायम
04 Sep 2026
राघव चड्ढा यांना धक्का
04 Sep 2026
चार पैकी एक जनधन खाते निष्क्रिय
07 Sep 2026
पंडित यांच्या अटकेविरोधात कलाकार कट्ट्यावर आंदोलन
05 Sep 2026
संगीत प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेला वाव देते : शिरीष चिटणीस
04 Sep 2026
चिमुकल्यांची राज यांना भावनिक साद
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार