डास मारण्यासाठी तलवार का वापरता?   

अन्न आणि औषध प्रशासनावर उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : डास मारण्यासाठी तलवारीचा वापर कशाला करता? असा प्रश्न करत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी  अन्न आणि औषध प्रशासनावर (एफडीए) ताशेरे ओढले आहेत. यानंतर ’सिप्ला फार्मा अँड लाइफ सायन्सेस लिमिटेड’चा परवाना रद्द करण्याचा दिलेला आदेशही एफडीएने मागे घेत असल्याचे सांगितले. मुंबई आणि पुण्यात सिल्पा कंपनी कार्यरत आहे. कंपनीने परवाना रद्द करण्याच्या एफडीएच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हा एफडीए मर्यादा सोडून आणि हुकूमशाही वृत्तीने वागत असल्याची कानउघाडणी न्यायालयाने केली. मुख्य न्यायाधीश रवींद्र घुगे आणि गौतम अखंड यांच्या समोर प्रकरण सुनावणीस आले होते. नैसर्गिक न्यायाच्या तत्वांविरोधात अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) वागत असल्याचे निरीक्षण नोंदविले. त्यावर, आम्ही परवाना रद्द करत असल्याचा आदेश मागे घेत आहोत, असे एफडीएने सांगितले.

Related Articles