E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
दरोड्याच्या गुन्ह्यातील पोलिस अद्यापही पसार
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
४२ दिवसानंतरही तपासाचे घोंगडे भिजत; कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
पुणे : नवले पूल परिसरात घडलेल्या एक कोटीच्या दरोड्यातील दाखल गुन्ह्यात मुख्य सूत्रधार असलेल्या खेड शिवापूर पोलिस चौकीतील महिला पोलिस हवालदार आणि पोलिस शिपाई हे गेल्या ४२ दिवसांपासून फरारीच आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या नर्हे पोलिसांकडून सुरू असला असला तरी आरोपी पोलिसांना शोधण्यात त्यांना अद्यापही यश मिळाले नाही. त्यामुळे नर्हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजिज जब्बार इसुब मेस्त्री (वय-३९) आणि प्रमिला शरद निकम (वय-४४) अशी त्यांची नावे आहेत. सध्या हे दोघेही फरार असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी नर्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी यापूर्वीच विक्रम चाकणकर (वय-४४), अमेय अरविंद कार्ले (वय-४६) आणि गणेश रमेश कदम (वय-३३, सर्व रा. धायरी) यांच्यासह तोतया पत्रकार आशिष तिवारी याला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी अभिजीत ऊर्फ बटर्या बाळासाहेब गाडे (रा. आंबेडकर वसाहत, धायरी) दाऊद सय्यद नदाफ (रा. बेनकर वस्ती, धायरी) आकाश ऊर्फ मुन्ना संजय गायकवाड (वय-३२, रा. कासुर्डी, भोर) प्रमोद विजयकुमार यादव (वय-२०, रा. गाउडदरा फाटा, हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांचाही शोध सुरु आहे.
हर्षवर्धन पवार हे १८ जुलै रोजी दुपारी सहकारी किरण आपटे यांच्यासह आपल्या मोटारीतून नवले पुलाजवळ असलेल्या बँकेच्या दिशेने जात होते. अचानक काही जणांनी त्यांचे मोटार अडवले. आम्ही पोलिस आहोत, तुम्ही बेकायदेशीर पैसे घेऊन जात आहात, असे सांगत आरोपींनी मोटारीचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यावेळी आरोपींनी मोटारीतील एक कोटीची रोकड असलेल्या दोन बॅग्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी आपटे हे ७३ लाखांची बॅग घेऊन ते निघून गेले. त्यामुळे ही रक्कम वाचली. या नंतर आरोपींनी पवार यांच्या मोटारीत बसवून त्यांना थेट खेड शिवापूर पोलिस चौकीत नेले. त्याठिकाणी त्यांच्या ताब्यातील दुसर्या बॅगेतील २६.५० लाख रुपयांपैकी २० लाख रुपये काढून घेण्याचा प्रयत्न झाला.
महिला पोलिस प्रमिला निकम व पोलिस शिपाई मेस्त्री यांच्या मदतीने आणि तोतया पत्रकार आशिष तिवारीने ती रक्कम स्वत:च्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. मात्र प्रकरण आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी ती रक्कम पुन्हा बॅगेत ठेवली. खेड शिवापूर पोलिस चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे नसले तरी समोरील हॉटेलमधील सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला. पुढील तपास नर्हे पोलिस करीत आहेत.
सहा आरोपींही पसार
या गुन्ह्यात थेट पोलिस नाईक अजिज मेस्त्री आणि महिला पोलिस अंमलदार प्रमिला निकम या दोन पोलिसांचा मुख्य सहभाग असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे दोघांना निलंबितही करण्यात आले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे, गुन्हा घडून ४२ दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. तरीही पोलिस स्वतःच्याच विभागातील या दरोडेखोर पोलिसांना अटक करू शकलेले नाहीत. त्यांच्या दिरंगाईवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, दोन पोलिसांसह सहा आरोपी अजूनही राजरोसपणे फरार आहेत.
पोलिसांवरच संशय?
एक कोटीची रोकड लुटण्याचा कट रचणार्या या पोलिसांच्या पाठीवर नेमका कोणाचा हात आहे, त्यांना खात्यातूनच कोणी गुप्त माहिती पुरवून त्यांना पळून जाण्यास मदत करत आहे का?, जर पोलिसच दरोडेखोरांना पाठीशी घालणार असतील, तर जनतेने सुरक्षेसाठी कोणाकडे पहावे, असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
या प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. पोलिस दलात अशा घटना अशोभनीय आहेत. दाखल गुन्ह्याचा पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे. सहभागी पोलिसांचे सीडीआर तपासले असून त्या दिशेने सुध्दा तपास सुरू आहे. लवकरच दोघांना अटक केली जाईल.
- वर्षा देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक (नर्हे पोलिस ठाणे)
Related
Articles
वाचक लिहितात
08 Sep 2026
जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचे आरोप
07 Sep 2026
मावळातील वारंगवाडीत ढोल-ताशांच्या गजरात रंगला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा
08 Sep 2026
पाकिस्तानात १५ बंडखोर ठार
04 Sep 2026
संगीत प्रत्येकाच्या बुद्धिमत्तेला वाव देते : शिरीष चिटणीस
04 Sep 2026
शिक्षकांचे महत्त्व टिकविण्यासाठी सर्व स्तरांवर संवादाची गरज
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार