E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पोलिस उपअधीक्षकाच्या नावाने मागितली २५ लाखांची लाच
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
पोलिस हवालदारांसह चौघांवर गुन्हा; दोघांना अटक
अकलूज, (प्रतिनिधी) : एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि नंतर अटकपूर्व जामीन व कलमे न लावण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या नावाने २५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दोन खासगी दलालांना साडेपाच लाख घेताना पकडण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
शुक्रवारी दुपारी २.३० वाजता माळशिरस येथे पालखी महामार्गावरील पिलीवर रस्त्यावर एका पुलाखाली ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराच्या भावासह इतर व्यक्तींविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिस हवालदार अनिल महादेव शिंदे यांनी तक्रारदाराकडे स्वतःसाठी आणि पोलीस अधीक्षक संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला होता. तक्रारदाराने ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारदाराच्या भावासह इतरांविरुद्ध ५६४-२२६ अन्वये गुन्हा दाखल झाला असल्याचे एसीबीच्या तक्रारीत नमूद केले आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी हवालदार अनिल शिंदे यांनी खासगी व्यक्ती आबा वळकुंदे याच्या मोबाइलवरून तक्रारदाराशी संपर्क साधून तुम्ही आधी २५ लाख दिले असते तर गुन्हा दाखल झाला नसता असे सांगून त्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी आणि पीसी पीएनडीटीचे कलम न लावण्यासाठी तपास अधिकारी संतोष वाळके यांच्यासाठी २५ लाख व काम झाल्यानंतर स्वतःसाठी ५ लाख अशी मागणी करून १० लाख स्वीकारल्याची तक्रार ॒पुणे येथे देण्यात आली.
पथकाने केलेल्या पडताळणीत खासगी व्यक्ती वळकुंदे याने २५ लाखांची मागणी केल्याचे व १० लाख स्वीकारल्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २७ ऑगस्टच्या पडताळणीत वळकुंदे व महादेव माने यांनी तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करण्यासाठी वाळके यांच्यासाठी ५ लाख व पोलिस राहुल वाघ यांच्यासाठी ५० हजार अशा एकूण साडेपाच लाखांची मागणी केली व दुसर्या दिवशी रक्कम घेऊन येण्यास सांगितले.त्यानुसार, पुणे विभागाच्या पथकाने सापळा रचून खासगी व्यक्ती आबा सावळा वळकुंदे (वय ४८, रा. वळकुंदे मळा, ६१ फाटा, ता. माळशिरस) आणि महादेव पंढरी माने (वय ३९, रा. मोटेवाडी, ता. माळशिरस) यांना तक्रारदाराच्या आई-वडिलांना अटक न करता नोटीस देण्यासाठी लोकसेवक राहुल वाघ यांच्याकरिता साडेपाच लाखांची लाच स्वीकारताना पकडले. या दोघांसह हवालदार अनिल शिंदे आणि राहुल वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Related
Articles
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
30 Aug 2026
शासकीय बैठका, कार्यक्रम आणि कार्यालयातील उपहारगृहात आता आरोग्यदायी अन्नपदार्थ
02 Sep 2026
ग्रामीण भागातून तंत्रज्ञान विश्वात नवनाथ दरेकरांची गगनभरारी
31 Aug 2026
अफगाणिस्तान मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज
01 Sep 2026
महाराष्ट्रातून ऑलिम्पिक सुवर्णविजेता घडविण्याचे लक्ष्य : मुरलीधर मोहोळ
30 Aug 2026
दहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?