E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पहिल्याच सुनावणीत दाम्पत्यांचा घटस्फोट मंजूर
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
कौटुंबिक न्यायालयाचा निकाल
पुणे : लग्नानंतर दोघांमध्ये मतभेद झाले. स्वभाव आणि विचारसरणीतील तफावतीमुळे केवळ दोन महिन्यांतच वेगळे राहणार्या दाम्पत्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अन् २१ ऑगस्ट रोजी दाखल केलेला दावा पहिल्याच सुनावणीत २७ ऑगस्ट रोजी निकाली काढण्यात आला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. यादव यांनी हा निकाल दिला आहे.
दाम्पत्य हे जुलै २०२४ पासून वेगळे राहत आहेत. आता दोघेही एकत्र येणे शक्य नाही. त्यामुळे सहा महिन्यांचा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली होती. त्यानुसार, न्यायालयाने हा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे, समुपदेशनासह सर्व न्यायालयीन प्रक्रिया १ दिवसात पूर्ण झाली. विवेक आणि पूजा (दोघांची नावे बदलली आहेत) अशी पती-पत्नीची नावे आहेत. दोघांनी वकील मंगेश कदम आणि वकील सुमेध जोगदंडे यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
२ मे २०२४ रोजी दोघांचे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पाहणी करून विवाह झाला. विवेक हा व्यावसायिक असून पूजा ही गृहिणी आहे. लग्नानंतर दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले.दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या असल्याने संसार देखील करणे दोघांना शक्य होत नव्हते. त्यामुळे पूजा ही ६ जुलै २०२४ रोजी माहेरी निघून गेली. मात्र, पूजा ही परत सासरी नांदायला आलीच नाही. त्यानंतर आणखी दोघांमध्ये मतभेद वाढले.यातून दोघांनी पुढे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत वकील मंगेश कदम यांना भेटले. दरम्यान, कदम यांनी समुपदेशनाद्वारे दोघांना एकत्र आणण्याचा खुप प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा समझोता न झाल्याने दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने देखील अत्यंत कमी कालावधीत दोघांचा घटस्फोट मंजूर केला.
Related
Articles
आरोग्य विभागाला सुविधांची प्रतीक्षा
31 Aug 2026
पाकिस्तानात १५ बंडखोर ठार
04 Sep 2026
एसआरआय अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार
04 Sep 2026
नेपाळकडे मदतीचा ओघ
30 Aug 2026
बिकानेरमधील अपघातात बालकासह तिघांचा मृत्यू
30 Aug 2026
राज्यात भाजपला खडसेंनी उभे केले : पवार
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?