E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ अरविंद खळदकर यांचे निधन
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
पुणे : जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, डेक्कन एज्येकशन सोसायटीचे माजी अध्यक्ष, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे माजी विश्वस्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद केशव खळदकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे दोन मुले, दोन मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बँकिंग, सहकार, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे माजी विश्वस्त, सहकार भारती नागरी बँक विभागाचे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. विविध विषयांचा व्यासंग असलेले खळदकर तल्लख बुध्दीमत्तेचे कुशल प्रशासक होते. आयकर विभागातून उपायुक्त पदावरुन त्यांनी १९९४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनंतर ते अखेरपर्यंत कर सल्लागार म्हणून काम करत होते. जनता सहकारी बँक, पुणेचे ते १९९७ पासून संचालक व २००१ पासून अध्यक्ष होते. त्यांच्याच कार्यकाळात जनता सहकारी बँक आर्थिक अडचणीतून बाहेर आली, ज्याचे रिझर्व्ह बँकेने देखील विशेष कौतुक केले होते.
त्यांच्याच कार्यकाळात जनता बँकेला बहुराज्यीय बँकेचा दर्जा मिळाला. याशिवाय शेअर बाजाराशी मैत्री, जोडोनिया धन शेअर्स व्यवहारे, गुंतवणूकीचे शास्त्र ही त्यांची पुस्तके वाचकप्रिय झाली. शेअर मार्केट, गुंतवणूक, बँकिंग आणि सहकार या विषयावर अनेकदा व्याख्याने दिली आणि विविध नियतकालिकांमधून विपुल लेखनही केले होते. संतसाहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास होता. मराठी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.
Related
Articles
शासकीय बैठका, कार्यक्रम आणि कार्यालयातील उपहारगृहात आता आरोग्यदायी अन्नपदार्थ
02 Sep 2026
मराठवाडा मुक्ती दिनाच्या मुहूर्तावर बीड-पुणे रेल्वे सेवा सुरू होणार
03 Sep 2026
21 किलो गांजा जप्त
01 Sep 2026
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
02 Sep 2026
शेअर बाजार घसरला
31 Aug 2026
मराठा समाजातील प्रत्येकाला कुणबी प्रमाणपत्रे द्या : जरांगे
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?