E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बाजारात पालेभाज्यांचा सुकाळ
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
वाहतूक खर्चही निघेना; शेतकरी आर्थिक संकटात
पुणे : पावसाने उघडीप दिल्यामुळे विविध प्रकारच्या पालेभाज्यांची बाजारात दुप्पटीने आवक वाढली आहे. मात्र आवकेच्या तुलनेत मागणी वाढली नसल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. मिळणार्या दरातून वाहतूक खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
पोषक वातावरणामुळे यंदा पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचाच परिणामी म्हणून मार्केटयार्डातील भाजीपाला विभागात पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पालेभाज्यांना मागणी वाढत नसल्यामुळे घाऊक बाजारात कवडीमोल दराने भाज्यांची विक्री होत आहे. नेहमीचा तुलनेत निम्माच दर मिळत आहे. आवक मात्र दुप्पट झाली आहे. सर्वच पालेभाज्यांच्या जुडीचे भाव घाऊक बाजारात १० रुपये अथवा त्यापेक्षा कमी आहेत. परिणामी, वाहतुक, उत्पादन खर्च मिळत नसून, शेतकर्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पालेभाज्या उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या जुडीची किरकोळ बाजारात १० ते २० रुपये दराने विक्री होत आहे.
मार्केट यार्ड येथील घाऊक बाजारात सद्य:स्थितीत पुणे जिल्ह्यातून पालेभाज्यांची आवक होत आहे. सर्वाधिक कोथिंबिरीची आवक होत आहे. शुक्रवारी बाजारात तब्बल २ लाख जुडी आवक झाली होती. त्या खालोखाल मेथीची ७० हजार ते ८० हजार जुडी, पालकची २० हजार जुडी, शेपूची ४० हजार जुडी, पुदीना आणि कांदापातची प्रत्येकी १५ ते २० हजार जुडी आवक झाली. तर उर्वरित पालेभाज्यांची १० हजार जुडीपेक्षा कमी आवक झाली.
घटलेले दर कायम राहतील
मागील काही दिवसांपासून मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक नेहमीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाली आहे. वाढलेली आवक कायम राहणार असल्याने पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.
- राजेंद्र सुर्यवंशी, पालेभाज्यांचे व्यापारी, मार्केट यार्ड
घाऊक बाजारातील गड्डीचे दर
भाजी
दर
कोथिंबिर
१ ते ५ रूपये
मेथी
५ ते १० रूपये
शेपू
२ ते ५ रूपये
पुदीना
३ ते ६ रूपये
पालक
४ ते ८ रूपये
कांदापात
५ ते १२ रूपये
Related
Articles
युट्युबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता घेतले ताब्यात
03 Sep 2026
सरकार स्वतःच गैरव्यवहारामध्ये अडकले
31 Aug 2026
मनमानीला झटका (अग्रलेख)
04 Sep 2026
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा इशारा
03 Sep 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
30 Aug 2026
लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत पराभूत
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?