E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अरुण फिरोदिया यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
पुणे : नाविन्य, तंत्रज्ञान आणि उद्योजकता या क्षेत्रांतील प्रेरणादायी प्रवासाचा वेध घेणारे, सुश्री तारा डोड्डीहाल यांनी लिहिलेले ’अरुण फिरोदिया-मिस्टर आर अँड डी, द वे अहेड’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते. हा कार्यक्रम सेनापती बापट रस्त्यावरील ’एमसीसीआयए ट्रेड टॉवर येथे झाला.
’अरुण फिरोदिया, मिस्टर आर अँड डी: द वे अहेड’ हे पुस्तक डॉ. अरुण फिरोदिया यांचे जीवन, त्यांचे विचार आणि नाविन्यपूर्ण प्रवासाचा आढावा घेणारे आहे. हे पुस्तक गतिशीलता, शाश्वतता, ग्रामीण विकास आणि उद्योजकता या क्षेत्रांतील त्यांचे कार्य व दृष्टिकोन मांडते. तसेच, कुतूहल, प्रयोगशीलता आणि ’का नाही?’ अशी सकारात्मक वृत्ती कशा प्रकारे अर्थपूर्ण नाविन्यपूर्ण बदलांना जन्म देऊ शकते, यावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. मर्यादांमध्येही संधी शोधणे आणि तंत्रज्ञान व उद्योजकतेला एका व्यापक सामाजिक उद्देशाशी जोडणे, यासाठी तरुण संशोधक, विद्यार्थी, उद्योजकांना प्रेरित करण्याचा या पुस्तकाचा उद्देश आहे.
’कायनेटिक ग्रुप’चे अध्यक्ष डॉ. अरुण फिरोदिया हे भारतातील सर्वसामान्यांपर्यंत परवडणारी गतिशीलता पोहोचवण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी भारतातील अत्यंत यशस्वी अशा स्वदेशी उत्पादनांपैकी एक असलेल्या ’लूना’च्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या पुस्तकाच्या लेखिका सुश्री तारा डोड्डीहाल यांच्याकडे धोरण आणि संवाद या क्षेत्रांतील तीन दशकांहून अधिक काळाचा आंतरराष्ट्रीय अनुभव आहे. व्यावसायिक धोरणाला प्रभावी संवादाशी जोडण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे.
Related
Articles
सर्व सण-उत्सवांसाठी समान ध्वनी मर्यादेचे नियम
04 Sep 2026
कोलकात्यातील तृणमूलच्या कार्यालयावर हल्ला
04 Sep 2026
पंजाबमध्ये ’आप’च्या नेत्याची हत्या
30 Aug 2026
काळ्या समुद्रातील संघर्षाचा धान्य व्यापाराला फटका
04 Sep 2026
मणिपूरमध्ये दोन गटांतील चकमकीत दहशतवादी ठार
30 Aug 2026
भारताची विजयी सलामी
01 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?