E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध; १५७ पदे रिकामी
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
पुणे : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेला एकूण ४३६ शिक्षक उपलब्ध झाले आहेत. उपलब्ध शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना जिल्ह्यातील रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये नियुक्त केले जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या नियमित अध्ययन-अध्यापनावर परिणाम होत होता. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील काही शाळांमध्ये आवश्यक संख्येने शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने रिक्त पदांची माहिती राज्य शासनास सादर केली होती. त्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली.
जिल्हा परिषदेकडे उपशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची मिळून एकूण ६०१ पदे रिक्त होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ४३६ पदांसाठी शिक्षक उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपशिक्षकांची ३६२ पदे रिक्त होती. पवित्र पोर्टलद्वारे त्यापैकी २३४ उपशिक्षक उपलब्ध झाले आहेत. तसेच भाषा आणि विज्ञान विषयांच्या पदवीधर शिक्षकांची २३१ पदे रिक्त होती. त्यापैकी २०२ पदवीधर शिक्षक उपलब्ध झाले आहेत. अशाप्रकारे एकूण ५९३ रिक्त पदांपैकी ४३६ पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यानंतरही उपशिक्षकांची १२८ आणि पदवीधर शिक्षकांची २९ अशी एकूण १५७ पदे रिक्त राहणार आहेत. उर्वरित पदे पुढील भरती प्रक्रियेत भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात उपलब्ध झालेल्या शिक्षकांमुळे अनेक शाळांना तातडीचा दिलासा मिळणार आहे.
नियुक्तीसाठी उपलब्ध झालेल्या शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर पार पडणार आहे. या प्रक्रियेत रिक्त पदे, शाळांची आवश्यकता आणि संबंधित शिक्षकांची पात्रता यांचा विचार करून शाळांचे वाटप केले जाणार आहे. समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात येतील. त्यानंतर संबंधित शिक्षकांनी नियुक्त केलेल्या शाळांमध्ये रुजू होणे अपेक्षित आहे.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे उपलब्ध झालेले ४३६ शिक्षक लवकरात लवकर संबंधित शाळांमध्ये रुजू झाल्यास विद्यार्थ्यांना त्याचा मोठा लाभ मिळेल. शिक्षकांची कमतरता दूर करून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे हा आमचा प्राधान्यक्रम आहे.
- विवेक वळसे पाटील, उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद
Related
Articles
राघव चड्ढा यांना धक्का
04 Sep 2026
आसाममध्ये १.८७ कोटींचे अमली पदार्थ जप्त
30 Aug 2026
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
30 Aug 2026
दिल्लीत ४७.७ लाख नावे वगळली
01 Sep 2026
मराठीचे प्रेम, की मतपेट्यांवर नेम ?
01 Sep 2026
मणिपूरमध्ये दोन गटांतील चकमकीत दहशतवादी ठार
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?