E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
साखर, गुळाचा गोडवा वाढला
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
साखरेच्या दरात १५, तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांनी घट
पुणे : केंद्र सरकारने परदेशातून तयार साखर आयात करण्यात परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे साखर आणि गुळाचा गोडवा वाढला आहे. वाढलेल्या साखरेच्या दरात आठवडाभरात घाऊक बाजारात किलोमागे तब्बल १५ रुपयांनी घट झाली आहे. तर गुळाच्या दरात ७ ते ८ रुपयांनी घसरण झाली आहे. अशी माहिती व्यापार्यांनी दिली.
मागील काही महिन्यांपासून साखरेच्या आणि गुळाच्या दरात मोठी वाढ झाली होती. वाढलेल्या दराचा सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित कोलमडले होते. आता दर कमी झाल्यामुळे श्रावण महिन्यातील १५ दिवस साखरेसाठी ज्यादा पैसे मोजावे लागणार्या सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. उर्वरित श्रावण महिन्यासह बाप्पाच्या आगमनाच्या वेळी साखर आणि गुळ स्वस्त असणार आहेत. त्यामुळे सणाचा गोडवा आता अधिक वाढणार आहे.
जून महिन्यापासून साखरेची दरवाढ सुरू झाली. मात्र, श्रावण महिन्यातील सण, उत्सवामुळे घरगुती ग्राहकांसह प्रक्रिया उद्योगांकडून साखरेला मागणी वाढली. त्यातच मागील हंगामात कमी झालेले उत्पादन, यंदा पाऊस लांबल्याने विलंबाने उत्पादन सुरू होणार आहे. या सर्व कारणांमुळे साखरेचे दर वाढले होते. साखर महागल्याने गुळही महागाला होता. पुढील काळात गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी हा सणासुदीचा काळ असणार आहे. या कालावधीत साखर आणि गुळाला मागणी असणार आहे.
या पार्श्वभूमीवर १० लाख टन साखरेसाठीच्या कच्च्या मालाची आवक करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली. मात्र, कच्चा माल आल्यानंतर त्यापासून साखर बनविण्यास दीड ते २ महिन्याचा कालावधी लागणार होता. या परिस्थितीत सरकारने निर्णय बदलला. थेट तयार साखर आयात करण्यास परवानगी दिली. मार्केट यार्डातील भुसार बाजारात साखरेची दररोज १०० ते १५० टन, तर गुळाची ७० ते ८० टन आवक होत आहे.
साखरेचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने आखलेल्या धोरणामुळे आठवडाभरात दरात मोठी घसरण झाली आहे. आता पुरेपुर साखरेचा साठा आहे. दरवाढ झाल्यानंतर अगदी घरगुती ग्राहकांनीही साखर खरेदी करून ठेवल्यामुळे येत्या काळात दरात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे.
- ईश्वर नहार, साखरेचे व्यापारी, मार्केट यार्ड
मागील काही दिवसांपासून गुळाच्या दरात सातत्याने वाढ होत होती. साखरेच्या दरात घट झाल्याने आणि राखी पौर्णिमा सणाची खरेदी संपल्यामुळे गुळाच्या दरात घट झाली आहे. आगामी सणाच्या काळात गुळाला मागणी असणार आहे. मात्र, साखरेचे दर स्थिर झाल्यास गुळचे दरही स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
- जवाहरलाल बोथरा, गुळाचे व्यापारी, मार्केट यार्ड
घाऊक बाजारातील क्विंटलचे भाव
साखर
५२०० ते ५३००
गूळ नं. १
५८०० ते ६१००
बॉक्स
५५०० ते ७०००
Related
Articles
राघव चड्ढा यांना धक्का
04 Sep 2026
ध्रुव सितवाला याने पटकावले रौप्यपदक
03 Sep 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रखर लेझर, बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी सांगवीतील गणेश मंडळाच्या अध्यक्षाला शिक्षा
05 Sep 2026
पीसीबीच्या निर्णयांवर मिस्बाह नाराज; निवड समितीतून राजीनाम्याची तयारी
02 Sep 2026
झेडपीच्या सभागृहात आता तज्ज्ञांचा आवाज; राजकीय पुनर्वसनाला पात्रतेचा लगाम
08 Sep 2026
पाटस टोलनाक्यावर ओबीसी बचाव
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार