E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नीरज दुखापतीमुळे मुकणार आशियाई क्रीडा स्पर्धेला
Samruddhi Dhayagude
30 Aug 2026
डायमंड लीग फायनल आणि वर्ल्ड अॅथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिपही खेळणार नाही
नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा सप्टेंबरमध्ये होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शनिवारी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे त्याने ही माहिती दिली. लॉझान डायमंड लीगमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम ८८.०५ मीटर भालाफेक केल्यानंतर काही वेळातच प्रशिक्षणादरम्यान त्याच्या टाचेला दुखापत झाली. या दुखापतीत टाचेतील लिगामेंट फाटले आहे.
या दुखापतीमुळे नीरजला ५ सप्टेंबरला ब्रसेल्स येथे होणार्या डायमंड लीग फायनलमध्येही सहभागी होता येणार नाही. तसेच ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान बुडापेस्ट येथे होणार्या पहिल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिपलाही त्याला मुकावे लागणार आहे.
बराच काळ मेहनत केल्यानंतर आपली लय पुन्हा मिळवत असल्याचे जाणव होते. लॉझानमधील ८८.०५ मीटरची कामगिरीही त्याचे संकेत होते,’ असे नीरजने म्हटले. नीरजने यंदाच्या हंगामात दोन डायमंड लीग स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि दोन्ही ठिकाणी दुसरे स्थान मिळवले. दोहा (१९ जून) आणि लॉझान (२१ ऑगस्ट) येथील कामगिरीमुळे त्याला १२ गुण मिळाले आणि क्रमवारीत सहाव्या स्थानावर राहत तो ब्रसेल्स फायनलसाठी पात्र ठरला होता.
पाठीच्या दुखापतीतून करत होता पुनरागमन
नीरज गेल्या वर्षी सप्टेंबरपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त होता. त्यामुळे २०२६च्या हंगामाची त्याची सुरुवातही उशिरा झाली. दोहा डायमंड लीगमधून त्याने पुनरागमन केले. ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतही तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. तरीही ८५.८३ मीटरच्या भालाफेकीसह त्याने रौप्यपदक पटकावले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके
नीरज चोप्रा याने २०१८ जकार्ता आणि २०२३ हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. टोकियो २०२१ ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्ण, तर पॅरिस २०२४मध्ये रौप्यपदक जिंकले. २०२३ बुडापेस्ट जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून अॅथलेटिक्समधील जागतिक अजिंक्यपदाचे सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता.
Related
Articles
कचरा उत्पादक मोठे; प्रक्रिया यंत्रणांची तपासणी मात्र कागदावरच
31 Aug 2026
बळींची संख्या १२०० वर
04 Sep 2026
विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवस पाऊस
30 Aug 2026
मनमानीला झटका (अग्रलेख)
04 Sep 2026
राज्यातील ८४ टक्के बँकिंग व्यवसाय केवळ तीन शहरात
30 Aug 2026
चीनमध्ये ४० संशोधकांवर कारवाई
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?