महिला संघाला ५० लाखांचे बक्षीस   

नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर हॉकी इंडियाने संघासाठी ५० लाख रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. एम्स्टलव्हीन येथे झालेल्या एफआयएच महिला हॉकी विश्वचषकातील ५-६व्या स्थानाच्या लढतीत भारताने जागतिक क्रमवारीतील पाचव्या क्रमांकाच्या जर्मनीचा ३-१ असा पराभव करत पाचवे स्थान मिळवले. विश्वचषकात भारताची ५२ वर्षांनंतरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी १९७४च्या पहिल्या विश्वचषकात भारत चौथ्या स्थानी राहिला होता.

Related Articles