आयटी समभागांच्या खरेदीमुळे शेअर बाजार सावरला   

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून नुकसान सोसत असलेला शेअर बाजार शुक्रवारी सावरला. निर्देशांक वाढून बंद झाले. जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे ब्लू चीप आयटीच्या समभागांची मोठी खरेदी झाली.
 
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३३१ ने अर्थौं ०.४३ टक्क्यांनी वाढून ७७ हजार २६५ वर बंद झाला. दिवसभरात तो एका क्षणी ४२५ ने वाढून ७७ हजार ३५८ पर्यंत पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीत ८५ ने अर्थात ०.३५ टक्क्यांनी वाढ झाली. तो २४ हजार १७६ असा उच्चांकी बंद झाला.  टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्र्सेस, इन्फोसिस, टाटा महिंद्रा, एचसीएल टेक, टायटन आणि इटरनल यांच्या समभागांचे मूल्य वाढले. या उलट आयसीआयसीआय बँक, अल्ट्रा टेक सीमेंट, एशियन पेंट्स आणि आयटीसीच्या समभागांचे मूल्य घसरले  जागतिक पातळीवर खनिज तेलाचे दर काल आणखी घसरले. ब्रेंट खनिज तेलाचा निर्देशांक ०.१७ टक्क्यांनी घसरुन एका पिंपाचा दर ८९.६३ डॉलर्स एवढा झाला आशियातील दक्षिण कोरिया आणि शांघाय बाजार घसरुन बंद झाला तर जपान आणि हाँगकाँगचा बाजार वाढून बंद झाला..युरोपातील सकारात्मक वातावरण होते. अमेरिकेचा शेअर बाजार गुरुवारी वाढून बंद झाला होता. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी संस्थांनी गुरुवारी २९८.२६ कोटींची गुंतवणूक काढून घेतली. 
 
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या (आयटी) समभागांचे मूल्य काल वाढले. एनव्हिडियाच्या दमदार कमाई आणि आशावादी दृष्टिकोनामुळे या क्षेत्राला आधार मिळाला.त्यामुळे एआय-संबंधित गुंतवणुकीच्या सातत्याबद्दलचा आशावाद दृढ झाला आणि एंटरप्राइझ एआय डिप्लॉयमेंट व वर्कफ्लो इंटिग्रेशनमध्ये गुंतलेल्या कंपन्यांना फायदा झाला.
 
शेअर बाजार सावरला असला तरी ठराविक कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल अधिक आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे अध्यक्ष जॅक्सन होले व्याजदराबाबत कोणती घोषणा करतात आणि जागतिक तरलता स्थिती यावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.  
 
 - विनोद नायर, मुख्य संशोधक,  जिओजित इनव्हेस्टमेंट
  

Related Articles