स्टावांगर (नॉर्वे) : नॉर्वेचे राजे हॅराल्ड पाचवे यांचे अमेरिकेत निधन झाले ते ८९ वर्षांचे होते. यानंतर त्याचे पुत्र आणि राजकुमार हाकोन आठवे हे नॉर्वेचे राजे झाले आहेत.नाझींनी नार्वे बळकावल्यानंतर हेराल्ड परागांदा झाले होते. त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतला होता. त्यांंचे निधन झाल्याची माहिती राजप्रासादातून देण्यात आली. हॅराल्ड हे युरोपमधील सर्वात वृद्ध राज्यकर्ते होते. या लोकप्रिय राजाने राजघराण्याचे आधुनिकीकरण केले; परंतु अलीकडच्या काळात पदत्याग करणार्या इतर वृद्ध राज्यकर्त्यांचा कित्ता गिरवण्यास त्यांनी नकार दिला. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र ’हाकोन आठवे’ आपोआप राजे बनले आहेत. युरोपातील राजेशाहीप्रमाणे नॉर्वेतही प्रतिकात्मक राजेशाही आहे. राजाला मानसन्मान असतो. मात्र, लोकनियुक्त संसदच देशाचा गाडा हाकते.जानेवारी १९९१ मध्ये हॅराल्ड यांचे वडील आणि राजे ओलाव्ह पाच यांचे निधन झाले. यानंतर हॅराल्ड यांच्याकडे पदाची सूत्रे आली होती.
Fans
Followers