पुद्दुचेरी : केंद्र शासित पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा द्यावा, या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे सांगत मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी राजीनामा देण्याची तयारी असल्याचे शुक्रवारी सांगितले. पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी दीर्घकाळापासून होत आहे. केंद्राकडे सर्व अधिकार आहेत. मात्र, राज्याकडे तसे नाहीत. असे आता चालणार नाही, असे सांगत रंगास्वामी म्हणाले, या विषयावर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे त्यांनी विधानसभेत सांगितले. विरोधी पक्ष नेते एमएमएच नझीम यांनी राज्याच्या दर्जाचा मुद्दा मांडला होता. प्रदीर्घ काळापासून केली जात असलेली मागणी केंद्र सरकारने का मान्य केली नाही ? असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच याविषयावर संयुक्तपणे निदर्शने करण्याची गरज बोलून दाखवली. त्यावर ते बोलत होते.
Fans
Followers