E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
जलप्रलयानंतर जग धावले नेपाळच्या मदतीला
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
भारताकडून ४७.५ टन मदतसाहित्य; अमेरिका, चीनसह आंतरराष्ट्रीय संस्थांचा हातभार
काठमांडू : नेपाळमध्ये हिमनदी कोसळल्यानंतर आलेल्या भीषण जलप्रलयाने मोठी जीवितहानी आणि प्रचंड नुकसान झाले असून, संकटग्रस्त नेपाळच्या मदतीसाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. भारत, चीन, अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण कोरियासह विविध देशांनी आर्थिक मदत, आपत्कालीन साहित्य, वैद्यकीय मदत आणि बचाव पथके उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय संस्थांनीही मदतकार्याला वेग दिला आहे.
भारताने नेपाळला आतापर्यंत दोन विमानांतून ४७.५ टन मदतसाहित्य पाठवले आहे. पहिल्या विमानातून १० टन, तर दुसर्या विमानातून आणखी ३७.५ टन मानवतावादी मदत, अत्यावश्यक औषधे आणि अन्नसामग्री पाठविण्यात आली. तात्पुरते निवारे, ब्लँकेट, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांचा मदतीत समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्याशी संवाद साधून भारताकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली.
चीनने आपत्कालीन मदतसाहित्य आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या यंत्रणांकडूनही सीमावर्ती भागात बचावकार्य सुरू आहे. अमेरिकेने आपत्ती प्रतिसाद सल्लागार नेपाळला पाठविण्याचा निर्णय घेतला असून, तातडीच्या मदतकार्यासाठी ५ लाख डॉलरची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. दक्षिण कोरियाने नेपाळसाठी १० लाख डॉलरची मानवतावादी मदत जाहीर केली असून, आपत्ती प्रतिसाद पथकही पाठविण्यात आले आहे.
ब्रिटनने नेपाळला ५० लाख पौंडांची मदत देण्याची घोषणा केली असून, आपत्कालीन प्रतिसादासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे. युरोपियन युनियनने आपत्तीची व्याप्ती आणि गरजेनुसार मदत वाढविण्याची तयारी दर्शविली आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस व रेड क्रिसेंट महासंघाने नेपाळ रेडक्रॉसच्या मदतकार्यासाठी जवळपास १० लाख स्विस फ्रँक (१२.४ लाख डॉलर) आपत्कालीन निधी उपलब्ध केला आहे. या निधीतून बाधित नागरिकांना तातडीची मदत, निवारा आणि आवश्यक वस्तू पुरविण्यात येणार आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने नेपाळला अत्यावश्यक औषधे आणि बहुउद्देशीय तंबूंसह वैद्यकीय साहित्य पाठवले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पथकांकडूनही नेपाळ सरकारच्या मदत व बचावकार्याला सहकार्य केले जात आहे. नेपाळसाठी जागतिक बँकेने १६३.५५ दशलक्ष डॉलरच्या आपत्कालीन मदतीची घोषणा केली आहे. या मदतीमुळे पुनर्वसन आणि आपत्तीग्रस्त पायाभूत सुविधांच्या उभारणीला हातभार लागण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जलप्रलयामुळे नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर रस्ते, पूल, घरे आणि जलविद्युत प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. हजारो नागरिक विस्थापित झाले असून अनेक भागांशी संपर्क तुटला आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून, मदतकार्याला दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि खराब झालेले दळणवळण यामुळे अडथळे येत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळणारी मदत नेपाळच्या बचाव, उपचार आणि पुनर्वसनाच्या प्रयत्नांसाठी महत्त्वाची ठरत आहे.
Related
Articles
झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’
04 Sep 2026
सर्व सण-उत्सवांसाठी समान ध्वनी मर्यादेचे नियम
04 Sep 2026
न्यायाधीशांच्या बंगल्यावर चोरट्यांचे लक्ष्य
31 Aug 2026
महागाईच्या झटक्यांनी नागरिक त्रासले
01 Sep 2026
व्हॉट्सऍप कट्टा
31 Aug 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?