E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
समुद्री अणुऊर्जा तंत्रज्ञानासाठी भारत ‘एटलस’मध्ये
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
व्यापारी जहाजे अणुऊर्जेवर चालविण्याची शक्यता
वॉशिंग्टन : समुद्री क्षेत्रात अणुऊर्जेच्या वापराच्या शक्यता तपासणार्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) जागतिक उपक्रमात भारत सहभागी झाला आहे. या उपक्रमांतर्गत व्यापारी जहाजांसाठी अणुऊर्जेचा वापर, तसेच समुद्रात तरंगते अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे.
आयएईएने वॉशिंग्टन येथे आयोजित मंत्रिस्तरीय परिषदेत ‘एटॉमिक टेक्नॉलॉजीज लाइसन्स्ड फॉर अॅप्लिकेशन्स अॅट सी’ (एटलस) या उपक्रमाची सुरुवात केली. भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी या परिषदेत सहभाग घेतला.
आयएईएचे महासंचालक मारियानो ग्रॉसी यांनी अणुऊर्जा आणि समुद्री क्षेत्र एकत्र आणल्यामुळे ऊर्जा आणि जहाज वाहतूक या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांच्या भविष्यास आकार देण्याची संधी निर्माण होत असल्याचे सांगितले. समुद्रातील अणुतंत्रज्ञानाचा सुरक्षित, संरक्षित आणि शांततापूर्ण वापर याबाबत जागतिक विश्वास निर्माण करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
‘एटलस’ उपक्रमांतर्गत व्यापारी जहाजांसाठी लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांचा (एसएमआर) वापर करण्याच्या शक्यतांचा अभ्यास केला जाणार आहे. या तंत्रज्ञानामुळे जहाजांना वारंवार इंधन भरण्याची आवश्यकता कमी होऊन दीर्घकाळ समुद्री प्रवास करणे शक्य होऊ शकते. तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पांसारख्या तंत्रज्ञानामुळे किनारी आणि दुर्गम भागांतील समुदाय तसेच उद्योगांना विश्वासार्ह वीजपुरवठा उपलब्ध होऊ शकतो, असे आयएईएने म्हटले आहे.
मोहंती यांनी भारताची विस्तीर्ण समुद्रकिनारपट्टी, मोठ्या संख्येने असलेली समुद्रातील बेटे आणि वेगाने विस्तारत असलेले व्यापारी जहाज वाहतूक क्षेत्र यामुळे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांच्या वापरासाठी मोठ्या संधी असल्याचे सांगितले. समुद्रातील ऊर्जा पुरवठ्याबरोबरच भविष्यात नागरी जहाजांच्या प्रणोदनासाठीही या तंत्रज्ञानाचा विचार करता येऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.‘एटलस’ उपक्रम भारताच्या दीर्घकालीन ऊर्जा धोरणाशी सुसंगत असून आर्थिक विकास, ऊर्जा सुरक्षा आणि हवामानविषयक उद्दिष्टांना पूरक ठरणारी विश्वासार्ह आणि कमी-कार्बन वीज उपलब्ध करून देणे हा भारताच्या ऊर्जा धोरणाचा भाग असल्याचे मोहंती यांनी स्पष्ट केले.
२०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा
भारताने २०४७ पर्यंत १०० गिगावॅट अणुऊर्जा क्षमता उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. तसेच २०३३ पर्यंत देशात विकसित केलेल्या किमान पाच ‘भारत स्मॉल मॉड्युलर रिअॅक्टर’ तैनात करण्याचे लक्ष्य असलेल्या अणुऊर्जा अभियानाचीही घोषणा करण्यात आली आहे.
Related
Articles
पुराचा ठपका भारत, चीन आणि अमेरिकेवर
03 Sep 2026
नारळाच्या करवंटीला कल्पकतेचे कोंदण
31 Aug 2026
डीजेविरोधात भूमिका घेणार्यास मारहाण
04 Sep 2026
पेट्रोलच्या पावतीवर इथेनॉलचे प्रमाण द्या
01 Sep 2026
एअरटेल घसरला; पण व्यवसाय मजबूत
31 Aug 2026
जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात ४३६ शिक्षक उपलब्ध; १५७ पदे रिकामी
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?