E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
समाविष्ट गावांतील कर आकारणीचे विशेष लेखापरीक्षण करा
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
पुणे
: महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 1 एप्रिल 2025 ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत झालेल्या अधिकृत तसेच अनधिकृत बांधकामांच्या कर आकारणीचे विशेष लेखापरीक्षण करण्याचा ठराव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.
कर आकारणीतील त्रुटी आणि त्यातून झालेल्या संभाव्य महसूल गळतीची मिळकतनिहाय चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी प्रस्तावात करण्यात आली आहे. नगरसेविका रत्नमाला संदीप सातव यांनी हा ठराव सूचविला होता. समाविष्ट गावांमध्ये कमी क्षेत्रफळावर किंवा चुकीच्या वापरानुसार कर आकारणी झाली आहे का? कर आकारणी न झालेली बांधकामे किती आहेत तसेच अनधिकृत बांधकामांमुळे महापालिकेच्या महसुलाचे किती नुकसान झाले? याची पडताळणी ऑडिटमध्ये करण्यात यावी, असे ठरावात नमूद आहे. मिळकत क्रमांक, मंजूर व प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रफळ, करपात्र क्षेत्रफळ, बांधकामाचा प्रत्यक्ष वापर, कर आकारणी, फेरकर आकारणी, कर मागणी, वसुली आणि थकबाकी यांचीही तपासणी करण्याची मागणी आहे.
कर आकारणी करणार्या अधिकारी-कर्मचार्यांचा अधिकारीनिहाय अहवाल तयार करून त्रुटी आणि जबाबदारी निश्चित करण्याबरोबरच कर आकारणी, बांधकाम, नगररचना, क्षेत्रीय कार्यालय तसेच आवश्यकतेनुसार जीआयएस व सर्वेक्षण विभागाचे संयुक्त तपासणी पथक नियुक्त करण्याची सूचना करण्यात आली आहे. बांधकाम परवानगी, मंजूर नकाशे, प्रत्यक्ष बांधकाम आणि कर अभिलेख यांचे परस्पर पडताळणी करण्यात येणार आहे. अनियमितता, निष्काळजीपणा किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. जाणीवपूर्वक महसूल नुकसान किंवा अभिलेखात फेरफार आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करून कमी आकारलेली अथवा थकीत कररक्कम वसूल करावी, अशी मागणी आहे. विशेष लेखापरीक्षणाचा सविस्तर अहवाल आणि कारवाई अहवाल (30 दिवसांत स्थायी समितीसमोर सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Related
Articles
सिडको प्रशासनाचा ढिसाळ कारभार
04 Sep 2026
भारताची दक्षिण कोरियाविरुद्ध सलामीची लढत
30 Aug 2026
ते काही संत नाहीत दीपकेंबद्दल वांगचूक यांची प्रतिक्रिया
30 Aug 2026
प्रश्नपत्रिका फुटली तेव्हा मी आयोगात नव्हतो!
03 Sep 2026
मुलाला गमावलेल्या पित्याचा संताप; रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला जाब
31 Aug 2026
गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?