E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युक्रेनच्या नऊ शहरांवर रशियाचा हल्ला
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
कीव्ह : रशियाने युक्रेनमधील नऊ शहरांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. बुधवारी रात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत हे हल्ले सुरू होते. राजधानी कीव्हमध्ये सकाळच्या वेळेपर्यंत स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. या हल्ल्यात दक्षिणेकडील झापोरिझ्झिया भागात एका वृद्धेचा मृत्यू झाला असून, अन्य भागांत नऊ जण जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या अधिकार्यांनी दिली.
हा हल्ला औद्योगिक आस्थापने, तेलशुद्धीकरण कारखाने, रसद केंद्रे आणि बंदराशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आल्याचे रशियाने म्हटले आहे. मात्र, या हल्ल्यात निवासी इमारतींसह नागरी भागांचेही नुकसान झाले. युक्रेनला रशियाच्या क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकेकडून मिळणार्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांची कमतरता जाणवत आहे. त्यातच रशियाने वेगवान, जेट इंजिनवर चालणार्या ड्रोनचा वापर सुरू केल्याने युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेसमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.
रशिया दर काही दिवसांनी मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ले करून युक्रेनच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर संख्याबळाच्या जोरावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा युक्रेनच्या अधिकार्यांनी केला. प्रत्युत्तरादाखल युक्रेनकडूनही रशियातील महत्त्वाच्या लक्ष्यांवर दीर्घ पल्ल्याच्या ड्रोनद्वारे हल्ले केले जात आहेत. कीव्हमधील चार जिल्ह्यांना रात्रीच्या हल्ल्याचा फटका बसला. निवासी इमारती, शाळा आणि वैद्यकीय केंद्राचे नुकसान झाले; मात्र कीव्हमध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
Related
Articles
जनसंपर्काने जीडीपी चमकेल,पण अर्थव्यवस्था नाही!
03 Sep 2026
गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटला बंदी
04 Sep 2026
बळींची संख्या एक हजारावर
02 Sep 2026
शिक्षकांचे महत्त्व टिकविण्यासाठी सर्व स्तरांवर संवादाची गरज
07 Sep 2026
नीट-पीजीच्या फेरपरीक्षेचा जनहित अर्ज फेटाळला
04 Sep 2026
मावळातील वारंगवाडीत ढोल-ताशांच्या गजरात रंगला श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार