E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनकडून १३ हजार फूट उंचीवर वीज निर्मिती
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
बीजिंग : जमिनीवरील पवनचक्क्यांऐवजी आकाशातील वेगवान वार्यांचा वापर करून वीज निर्मिती करण्याच्या दिशेने चीनने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. चीनमध्ये १३ हजार फूट उंचीवर ‘एअरबोर्न विंड एनर्जी सिस्टीम’ उडवून वीज निर्मितीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. इतक्या उंचीवर अशा प्रकारच्या प्रणालीद्वारे वीज निर्मितीची ही पहिलीच यशस्वी चाचणी असल्याचा दावा सरकारी माध्यमांनी केला आहे.
या प्रोटोटाइपला ‘एस-४०००’ असे नाव देण्यात आले आहे. उत्तर-पश्चिम चीनमध्ये झालेल्या चाचणीदरम्यान या क्राफ्टने निर्धारित उंची गाठणे, हवेत स्थिर राहणे, वार्यापासून वीज निर्माण करणे आणि त्यानंतर सुरक्षितपणे जमिनीवर परतणे, हे संपूर्ण चक्र यशस्वीरीत्या पूर्ण केले.
‘एस-४०००’चा आकार साधारण ‘बोइंग ७४७’ विमानाएवढा असून त्याची रचना विमानासारखी आहे. त्यामध्ये हेलियमचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक विमानाप्रमाणे सतत इंधन जाळण्याची आवश्यकता नसून, ते हवेत तरंगू शकते. अधिक उंचीवर तुलनेने वेगवान आणि सातत्यपूर्ण वारे उपलब्ध होत असल्याने त्यांचा उपयोग वीज निर्मितीसाठी करण्याची संकल्पना आहे.
या प्रणालीला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी हलविता येणे हेही तिचे वैशिष्टय आहे. त्यामुळे डोंगराळ प्रदेश, वाळवंट, दुर्गम बेटे तसेच नैसर्गिक आपत्तींमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या भागांमध्ये तात्पुरता वीजपुरवठा करण्यासाठी तिचा उपयोग होऊ शकतो.‘सॉवेस एनर्जी टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअपने सिंघुआ विद्यापीठ आणि एरोस्पेस इन्फॉर्मेशन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही प्रणाली विकसित केली आहे. कंपनीने यापूर्वी ‘एस-१५००’ची १,५०० मीटर आणि ‘एस-२०००’ची २,००० मीटर उंचीवर चाचणी केली आहे. आता सहा हजार मीटर उंचीवर कार्य करू शकणार्या ‘एस-६०००’ प्रणालीवर काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
पारंपरिक पवनचक्क्यांना पर्याय?
तीन हजार मीटर उंचीवर या प्रणालीद्वारे होणार्या वीज निर्मितीचा खर्च जमिनीवरील पवन ऊर्जा प्रकल्पांच्या जवळपास येऊ शकतो. भविष्यात नऊ हजार मीटर उंचीपर्यंत प्रणाली कार्यरत झाल्यास वर्षातील आठ हजार तासांहून अधिक काळ वीज निर्मिती करणे शक्य होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
चीनमध्ये यासोबतच उंचावरील वार्यांचा वापर करण्यासाठी पतंग किंवा पॅराशूटसदृश उपकरणांच्या तंत्रज्ञानावरही प्रयोग सुरू आहेत. अशा उपकरणांना जमिनीवरील जनरेटरशी जोडून वार्यामुळे निर्माण होणार्या खेचण्याच्या शक्तीतून वीज निर्माण केली जाते. भविष्यात पारंपरिक पवनचक्क्यांना पर्याय किंवा पूरक ऊर्जा स्रोत म्हणून ‘आकाशातील पवन ऊर्जा’ तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे.
Related
Articles
पुणेकरांना त्रास होणार नाही याचा प्रशासनाने विचार करावा : श्रीकांत पाटील
31 Aug 2026
जाहीर केलेला विकास दर योग्यच
03 Sep 2026
बांगला देशही मक्का करारात ?
31 Aug 2026
सहकारी साखर कारखान्यांसाठी ‘सॉफ्ट लोन’ योजना
03 Sep 2026
वाई औद्योगिक वसाहतीत भीषण आग
03 Sep 2026
४१ लाखांची खंडणी गोव्यातील दोघांवर मुंबईत गुन्हा
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?