E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
सहा ठिकाणी कारवाई
पुणे
: मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजासाठी वापरण्यात येणार्या प्रेशर मिड आणि प्लाझ्माच्या वापराला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे. बुधवारी शहरातील विविध भागांत झालेल्या मिरवणुकांमध्ये सहा ठिकाणी डीजे ऑपरेटरकडून प्रेशर मिड आणि प्लाझ्माचा वापर होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात आली असून, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त करण्यात आल्या आहेत.
मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपक आणि डीजेच्या माध्यमातून होणार्या ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात आले होते. मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांच्या पथकांकडून आवाजाची पातळी तपासण्यात आली. यामध्ये शहरातील विविध ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजाची नोंद झाल्याचे समोर आले. दरम्यान, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवातील डीजेंच्या वापराबाबत दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्याची तयारी पोलिस प्रशासनाने दर्शविली आहे. सुमारे 80 टक्के गणेश मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
बुधवारी झालेल्या मिरवणुकांदरम्यान शहरात एक हजारहून अधिक ठिकाणी आवाजाची नोंद करण्यात आली. त्यापैकी तब्बल 148 ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल आवाज आढळून आला. त्यामुळे त्या डीजे ऑपरेटर आणि ध्वनिक्षेपक यंत्रणा चालकांविरोधात पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणार्या डीजे ऑपरेटरवर यापुढेही कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. मिरवणुकीत सहभागी होणार्या मंडळांनी आणि डीजे ऑपरेटरनी ध्वनीची निर्धारित मर्यादा पाळावी, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ध्वनिप्रदूषणावर पोलिसांची नजर
मिरवणुकीच्या काळात ध्वनीची पातळी तपासण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी यंत्रणेद्वारे नोंदी घेण्यात आल्या. आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे आढळलेल्या ठिकाणांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळातही ध्वनिप्रदूषण करणार्या डीजे आणि साउंड सिस्टिम चालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मिरवणुकीदरम्यान बुधवारी शहरातील विविध ठिकणी आवाजाची नोंद घेण्यात आली. त्यामध्ये 148 ठिकाणी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक डेसिबल आवाज आढळला असून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. प्रेशर मिड आणि प्लाइमाचा वापर करणार्यांवरही कारवाई केली जात आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
Related
Articles
पीएमआरडीएच्या प्रारूप संरचना योजनेच्या कामाला गती
02 Sep 2026
गदर पार्टीचे राजदूत - डॉ. मथुरा सिंह
04 Sep 2026
झेलेन्स्कींचे सहकारी ते प्रतिस्पर्धी!
30 Aug 2026
झाडणकामाच्या कंत्राटदारांना आता आठ टक्के ‘देखरेख शुल्क’
04 Sep 2026
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा इशारा
03 Sep 2026
दहशतवादाचे धोरण राबविणार्या देशाविरोधात उभे ठाका : मोदी
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?