E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मुलींचे जन्मदाखले मिळणार विनामूल्य
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
पुणे
: शहरात जन्मलेल्या मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी आणि समाजात स्त्री-सन्मानाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुलींचे जन्मदाखले विनामूल्य देण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या स्थायी समिती समोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शहरातून स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिलांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक कार्य केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा वारसा जपणे ही महापालिकेची सामाजिक जबाबदारी आहे. मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभाव दूर करण्यासाठी मुलीच्या जन्माकडे आनंद आणि अभिमानाची बाब म्हणून पाहण्याची गरज असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.मुलीच्या जन्मानंतर कुटुंबावर कोणताही अनावश्यक आर्थिक भार पडू नये तसेच संस्थात्मक पातळीवर तिच्या जन्माचा सन्मान व्हावा, यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी विभागामार्फत मुलींचे जन्मदाखले कोणतेही शुल्क न आकारता देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मुलीचा जन्म हा कुटुंबासह समाजासाठीही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न असल्याचे भिमाले म्हणाले.
Related
Articles
जयपूरमधील जीर्ण शाळा पाडली
03 Sep 2026
भारताची दक्षिण कोरियाविरुद्ध सलामीची लढत
30 Aug 2026
महागाई ‘डाचत’ नाही..?
30 Aug 2026
धमकीच्या घोषणा दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करु
30 Aug 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता बाबींचा आयुक्तांकडून आढावा
01 Sep 2026
सिडको प्रशासनाचा ढिसाळ कारभार
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?