E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अठरा नगरसेवकांची कुणबी जात प्रमाणपत्रे वैध
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
अजिंक्य एकाड
पुणे
: महापालिका निवडणुकीत कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षित जागांवर निवडून आलेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेतील 18 लोकप्रतिनिधींच्या जात प्रमाणपत्रांबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने छाननी केली आहे. उपलब्ध माहितीनुसार, संबंधित कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर या लोकप्रतिनिधींची कुणबी जात प्रमाणपत्रे वैध आणि ग्राह्य असल्याचा निष्कर्ष समितीने नोंदवला आहे.
महापालिका निवडणुकीत संबंधित उमेदवारांनी कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रांच्या सत्यतेबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते. या तक्रारींच्या अनुषंगाने समितीने संबंधित उमेदवारांची जात प्रमाणपत्रे, त्यासोबत सादर करण्यात आलेले पुरावे आणि अन्य आवश्यक अभिलेखांची छाननी केली. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधितांची प्रमाणपत्रे ग्राह्य असल्याचे समितीने स्पष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या लोकप्रतिनिधींच्या कुणबी जात प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे.
या प्रकरणांमध्ये महापौर रवि लांडगे, तानाजी बारणे, हर्षल ढोरे, रेखा पठारे, ज्ञानेश्वर जगताप, मनीषा लांडे, अनिल सातव, रत्नमाला सातव, ऐश्वर्या तरस-मुरकुटे, वृषाली कामठे-मारणे, भारतभूषण बराटे, हर्षल टिंगरे, आरती चोंधे, स्मिता वाडकर, बाबुराव चांदेरे, सुप्रिया चांदगुडे, विश्वजीत बारणे यांचा समावेश आहे. अशा एकूण 18 जणांच्या प्रकरणांची समितीकडून छाननी करण्यात आली आहे.जात प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षित जागांवर निवडणूक लढवणार्या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र हा अत्यंत महत्त्वाचा आणि कायदेशीरदृष्ट्या संवेदनशील विषय मानला जातो. अशा प्रकरणांमध्ये तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सक्षम पडताळणी समितीकडून कागदपत्रे, वंशावळीचे पुरावे आणि शासकीय अभिलेख तपासले जातात. या प्रकरणातही नियमानुसार छाननी करून संबंधित प्रमाणपत्रे ग्राह्य ठरवण्यात आल्याचे उपलब्ध माहितीवरून स्पष्ट होते.
पुणे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे नगरपरिषद, नगरपंचायती, महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ( इतर मागास वर्ग) आरक्षित जागेवर एकूण 99 उमेदवार निवडून आले होते. त्यापैकी आतापर्यंत 81 उमेदवारांना कुणबी जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे तर एका उमेदवाराचे जातीचे प्रमाणपत्र रद्द झाले आहे. उर्वरित 17 उमेदवाराच्या प्रकरणात 30 सप्टेंबर 2026 पर्यंत निर्णय होणार आहे.
Related
Articles
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
02 Sep 2026
देशाचे ऐक्य भंग करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही
05 Sep 2026
महिला संघाचा मलेशियावर दणदणीत विजय
07 Sep 2026
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
02 Sep 2026
तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेर्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार
03 Sep 2026
नेपाळच्या महापुरातून शेवगावच्या योगिनी पाटील सुखरूप
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार