E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानात ११ बंडखोर ठार
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वामध्ये सुरक्षा दलांची कारवाई
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांत सुरक्षा दलांनी ११ बंडखोरांना ठार केले. या कारवायांमध्ये ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) आणि अन्य बंडखोर गटांच्या सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती सरकारी माध्यमांनी गुरुवारी दिली.
दोन्ही प्रांतांतील विविध ठिकाणी या कारवाया करण्यात आल्या. बलुचिस्तानमधील सासूल भागात चार बंडखोर ठार झाले. खैबर पख्तूनख्वामधील बन्नू जिल्ह्यात दोन, तर दक्षिण वझिरीस्तान जिल्ह्यात टीटीपीच्या पाच बंडखोरांचा खात्मा करण्यात आला.सासूल भागात बंडखोरांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे सुरक्षा दलांनी सांगितले. या कारवायांचा नेमका कालावधी सरकारी माध्यमांनी स्पष्ट केलेला नाही; मात्र गेल्या काही दिवसांत या कारवाया करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी यशस्वी कारवाईबद्दल सुरक्षा दलांचे कौतुक केले. परदेशी मदतीने सक्रिय असलेल्या बंडखोर घटकांचा खात्मा करणे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि दीर्घकालीन शांततेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही सुरक्षा दलांच्या कारवाईचे स्वागत केले. दहशतवादाविरोधातील लढ्यात संपूर्ण देश सुरक्षा कर्मचार्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा येथे मागील आठवड्यात ४९ बंडखोर ठार झाले होते. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानमध्ये, विशेषतः बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतांत, बंडखोरांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे.
Related
Articles
गणेशोत्सवात पिंपरी-चिंचवडकरांसाठी दर ५ मिनिटांनी मेट्रो धावणार
07 Sep 2026
भारत-जपान यांच्यात प्रथमच टी-२० सामना
05 Sep 2026
श्रीकांतचा नवव्या मानांकित व्हिक्टरवर विजय
04 Sep 2026
इंग्लंड संघाच्या विशेष मार्गदर्शकपदी केविन पीटरसनची नियुक्ती
08 Sep 2026
शेतातील पाऊलवाटेच्या वादातून एकावर खुनी हल्ला
06 Sep 2026
अर्थव्यवस्थेचे सुंदर चित्र भासविण्याचा सरकारचा प्रयत्न
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार