E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानची हुकूमशाहीकडे वाटचाल
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
इम्रान यांच्या मुलांचा आरोप
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दीर्घकाळ तुरुंगात ठेवण्यात आले असून, त्यांच्याशी होत असलेल्या कथित गैरवर्तनावरून त्यांचे पुत्र सुलेमान ईसा खान आणि कासिम खान यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करावर गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असून, या परिस्थितीमध्ये लष्कराची मोठी भूमिका असल्याचा दावा सुलेमान यांनी केला.
इम्रान यांची तुरुंगातील परिस्थिती आणि आरोग्याविषयी त्यांच्या मुलांनी चिंता व्यक्त केली. इम्रान यांना तुरुंगात भेटण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असले, तरी पाकिस्तानी अधिकार्यांकडून व्हिसा अर्ज प्रलंबित ठेवले जातात किंवा नाकारले जातात, असा आरोप त्यांच्या मुलांनी केला. ‘‘आम्हाला वडिलांना भेटण्याची संधी मिळाल्यास आम्ही तत्काळ पाकिस्तानला येऊ. मात्र, आमचे व्हिसा अर्ज वारंवार नाकारले किंवा रोखले जात आहेत,’’ असे कासिम यांनी सांगितले.
इम्रान यांना दिवसातील २३ तास एकांतवासात ठेवले जात असून, त्यांची कोठडी केवळ सहा बाय आठ फुटांची असल्याचा दावा कासिम यांनी केला. या कोठडीत पुरेसा प्रकाश किंवा खिडकी नसल्याचेही त्यांनी म्हटले. ७३ वर्षांच्या इम्रान यांच्या एका डोळ्याची दृष्टी कमी झाल्याचा दावाही त्यांनी केला.
इम्रान खान यांचे वकील जेरेड जेनसर यांनी पाकिस्तानमधील लोकशाहीच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित करत लष्करी नेतृत्वाला लक्ष्य केले. लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या नेतृत्वाखाली दमनकारी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध होत असलेली कारवाई लोकशाही व्यवस्थेशी सुसंगत नसल्याचे जेनसर यांनी म्हटले.
इम्रान खान यांच्या आरोग्याची तपासणी आणि उपचारांवरूनही पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाला आहे. १८ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने इम्रान यांना ४८ तासांच्या आत अदियाला तुरुंगातून इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचे निर्देश दिले होते.
Related
Articles
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका
02 Sep 2026
सत्ताधार्यांना ‘गूंज’ टोचली...?
06 Sep 2026
सोलापुरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्ग प्रकल्पाला गती
02 Sep 2026
एल-निनोच्या संकटावर जलसंधारणाचा उपाय; 34 गावांना दिलासा
04 Sep 2026
पाकिस्तानची बिकट अवस्था
06 Sep 2026
'पुराच्या पाण्यात सापडलेली मासे खाऊ नका'
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार