E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
झाडाला खिळे ठोकून बांधला फलक
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
पर्यावरण प्रेमी आंदोलनाच्या तयारीत
लोहगाव
: लोहगाव हरणतळ जवळील सर्वे नंबर 35 मधील गायरानवस्तीत एक धक्कादायक आणि निसर्गाची क्रूर थट्टा करणारा प्रकार उघडकीस आला आहे. तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करताना स्थानिक तलाठ्याने शासकीय माहितीचा लोखंडी फलक थेट एका झाडाला खिळे ठोकून आणि पत्रा घट्ट बांधून लावल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार कृत्यामुळे संबंधित झाडाचा जीव अक्षरशः घुटमळत असून, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गायरान जमिनीवरील सर्वे नंबर 35 मध्ये महसूल विभागाने अधिकृत फलक लावण्याचे आदेश दिले होते. मात्र, हे आदेश राबवताना कर्मचार्यांनी पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवले. लोखंडी पत्रा झाडाच्या खोडाला अत्यंत निर्दयीपणे जखडण्यात आला आहे. यामुळे झाडाच्या नैसर्गिक वाढीला बाधा निर्माण झाली असून ते हळूहळू सुकण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे स्थानिक महसूल प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
या संतापजनक प्रकारानंतर स्थानिक पर्यावरण समिती आणि नागरिक आक्रमक झाले आहेत. गोरख साळवे, संजय मूलभारती, श्याम सदाफुले, लिंबा कावरे, सुनील पंडित, हरीश दंडाले, शामवेल कोल्हे, प्रकाश चव्हाण, रजनी सहारे, कृष्णा कोल्हे, सविता विटकर आणि युवराज कसबे या प्रमुख नागरिकांनी घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाचा निषेध केला.शासकीय फलक लावण्यासाठी झाडाचा बळी देणे अत्यंत चुकीचे आहे. प्रशासनाने तात्काळ तो पत्रा हटवून झाडाची मुक्तता करावी आणि निष्काळजी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा आम्ही सर्व नागरिक तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा पर्यावरण समितीच्या सदस्यांनी दिला आहे.
Related
Articles
बाळासाहेबांची पक्ष घटना उद्धव यांनीच बदलली
03 Sep 2026
अलकाराझचा तिसर्या फेरीत प्रवेश
04 Sep 2026
कोलकात्यातील तृणमूलच्या कार्यालयावर हल्ला
04 Sep 2026
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान कर्मचार्यांची दादागिरी
02 Sep 2026
साडेपाच टन मदतीचे साहित्य नेपाळकडे रवाना
02 Sep 2026
‘एनसीएमसी’ कार्डला १४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?