दिल्लीत मॉडेलची हत्या   

नवी दिल्ली : दिल्लीतील टिळक नगर परिसरात २१ वर्षांची मॉडेल मुस्कान हिची तिच्याच घरात चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणात तिचा जिम ट्रेनर इम्रान हा संशयित आरोपी असून, तो फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येत आहे. मुस्कान टिळक नगरमधील एका इमारतीत राहत होती. बुधवारी तिच्या घरी आलेल्या इम्रानने तिच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर मुस्कानच्या किंकाळ्या ऐकून शेजार्‍यांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. शेजार्‍यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

Related Articles