E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महाराष्ट्रातील ८० पर्यटक अडकले
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
मुंबई, (प्रतिनिधी) : नेपाळ-तिबेट परिसरातील महाराष्ट्रातील पर्यटकांची माहिती संकलित करण्यात येत आह. आतापर्यंत ८० जणांची माहिती समोर आली आहे. त्यापैकी, चार पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप आहेत. केंद्र सरकारशी सातत्याने संपर्क सुरू असून, यंत्रणा चोवीस तास सज्ज आहे, असे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
यासंदर्भात महाजन म्हणाले, प्रशासनाकडे ८० जणांची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, तेथील मोबाइल नेटवर्कची समस्या आणि दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळे संपर्क होत नाही. नातेवाईकांनी घाबरू जाऊ नये. केंद्र व राज्य सरकार महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांचा शोध घेत आहे. ‘रिचार्ड टूर्स ट्रॅव्हल्स’ च्या दोन वाहनांमधून पर्यटक कैलास मानसरोवर येथे गेले आहेत. त्यापैकी एका वाहनातील ३७ पर्यटक सुरक्षित आहेत. पूर आणि दरड कोसळल्याने तेथील दळण-वळण व्यवस्था विस्कळीत झाली असून, पर्यटकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत, असेही ते म्हणाले.
सर्व जिल्हाधिकार्यांना या भागात पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यास सांगण्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांकडे अतिरिक्त माहिती असल्यास ती उपलब्ध करून द्यावी. यासाठीचे संकेतस्थळ चोवीस तास सुरू आहे, असेही ते म्हणाले.
नेपाळ किंवा तिबेटमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्यांना तात्काळ आवश्यक ती मदत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (मंत्रालय, मुंबई) यांच्यातर्फे https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नेपाळमधील पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. मंत्रालयातील नियंत्रण कक्षात २४ तास हा कक्ष कार्यरत असून, ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे, त्यांनी राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईन : १०७० (टोल-फ्री क्रमांक), नियंत्रण कक्ष +९१-९३२१५८७१४३ किंवा controlroom@maharashtra.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी लिंकवर जाऊन त्यांची सविस्तर माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Related
Articles
मंधानाची शतकी खेळी
04 Sep 2026
डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन
30 Aug 2026
हम रह गये अकेले
04 Sep 2026
गणेशमूर्ती रंगवणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
31 Aug 2026
सरकार स्वतःच गैरव्यवहारामध्ये अडकले
31 Aug 2026
पुरवठा विभागाचा साठेबाजांना इशारा, १० टनांपेक्षा जास्त साखर आढळल्यास कारवाई
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?