E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
भोरमध्ये रानभाजी महोत्सव
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
५५ प्रकारच्या भाज्या विक्रासाठी
भोर (वार्ताहर) : गंगुताई पंतसचिव वाचनालयात अनंतराव थोपटे महाविद्यालयाने गुरूवारी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले होते. मावळ परिसरातील समृद्ध जैवविविधता, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनपद्धतीशी निगडित असलेल्या रानभाज्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महोत्सव भरवला होता. राजगड ज्ञानपीठाच्या मानद सचिव स्वरूपा थोपटे यांच्या महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव डोंगरे, डॉ. वर्षा कोरे, उपनगराध्यक्षा जयश्री शिंदे व नगरसेविका उपस्थित होत्या.
विद्यार्थ्यांनी मावळ भागातील सुमारे ५५ प्रकारच्या रानभाज्यां विक्रीस ठेवल्या होत्या. प्रत्येक भाजीची स्थानिक ओळख, पारंपरिक उपयोग, उपलब्धता, खाद्यपद्धती आणि आरोग्यदायी गुणधर्म याबाबतची माहिती यावेळी दिली. महिला बचत गटातील महिलांनी स्वतंत्र स्टॉल्स उभारले होते. तर काही निवडक रानभाज्यांचे पारंपरिक पदार्थ भाकरीसह चवीसाठी स्वतंत्र काउंटरवर ठेवले होते. डॉ. डी. के. गायकवाड रानभाज्यांचे पोषणमूल्य, स्थानिक रोजगाराच्या संधीबाबत माहिती दिली.
Related
Articles
गती कायम राहील का? (अग्रलेख)
03 Sep 2026
शेअर बाजार घसरला
31 Aug 2026
कनिष्ठ अभियंता भरतीतील गैरप्रकाराची व्याप्ती किती?
31 Aug 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पदपथ, स्वच्छता बाबींचा आयुक्तांकडून आढावा
01 Sep 2026
अडीच हजार नागरिक अजूनही बेपत्ता
30 Aug 2026
’डीजे’विरूद्ध नागरिकांचा संताप
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?