नेपाळमधील पर्यटकांसाठी सातार्‍यात नियंत्रण कक्ष   

सातारा, (वार्ताहर) : जिल्ह्यातील जे पर्यटक सध्या नेपाळमध्ये असून, पूरस्थितीमुळे अडकले आहेत, तसेच त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही, त्यांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
 
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. या पाश्वर्र्भूमीवर जिल्ह्यातील जे पर्यटक नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत.
 
तेथील पूर परिस्थितीमुळे अडकले आहेत. त्यांनी किंवा त्यांच्या येथील नातेवाइकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने दूरध्वनी क्रमांक ०२१६२-२३२३४९, ०२१६२-२३२१७५ मोबाईल क्रमांक ९६५७५२११२२ माहिती उपलब्ध केला आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचेनाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो प्रशासनास द्यावा. नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती व समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे.
 

Related Articles