E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
आँखों की गुस्ताखियाँ
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
राजभूषण सहस्रबुद्धे (मो. 9822206026)
आँखों की गुस्ताखियाँ, माफ हो
इक टुक तुम्हें देखती है
जो बात कहना चाहे ज़ुबां
तुमसे ये वो कहती है
आँखों की शर्मो हया माफ हो
तुम्हें देख के छुपती है
उठी आँखे जो बात ना कह सकीं
झुकी आँखें वो कहती है
ख़यालों की ये शोखियाँ माफ हो
मदहोश ये करती है
इस दिल की नादानियाँ माफ हो
ये मेरी कहा सुनती हैं
हम दिल दे चुके सनम (1999) मधील या गीतात प्रेमपूर्ण दृष्टीची विवशता SECRET IN THEIR EYES (2009) या अर्जेंटिनाच्या चित्रपटातील नायकाच्या मर्यादापूर्ण अन् खलनायकाच्या वासनांध दृष्टीतील मनोवैज्ञानिक फरक शोधू पाहते. जून 1974, ब्युनॉस आयर्समध्ये न्यायालयीन अधिकारी बेंजामीनचे विभाग प्रमुख इरीनवर अव्यक्त प्रेम आहे. त्याचवेळी दारुडा सहकारी पाब्लो आणि इरीनसोबत लिलियानाच्या बलात्कार अन् हत्येचा तपास चालू आहे. लिलियानाचा पती रिकार्डोला तो अपराध्याला कडक शिक्षा देण्याचे वचन देतो; पण वरिष्ठ रोमानो तपासात अडथळे आणतो. एकदा बेंजामीनला लिलियानाच्या जुन्या छायाचित्रांमध्ये सर्वत्र गोमेझ हा व्यक्ती तिच्याकडे एकटक, वेड्यासारखा पहात असल्याचे जाणवते. म्हणून तो आणि पाब्लो गोमेझच्या घरात घुसतात. अन् त्याची काही पत्रे चोरून आणतात. त्यात काहीच पुरावा नसल्याने वरिष्ठांकडून कान उघाडणी होऊन, अखेरीस तपास बंद होतो.
1975, रिकार्डो अजूनी मारेकर्याच्या शोधात असल्याचे बेंजामीनला समजते. म्हणून तो इरीनला हा तपास पुन्हा सुरु करण्यास सुचवतो. दरम्यान पाब्लोला समजते की, त्या पत्रांतील अनेक नावं ’रेसिंग’ फुटबॉल संघाच्या खेळाडूंची आहेत. म्हणजेच गोमेझ त्या संघाचा चाहता आहे. गोमेझला शोधण्यासाठी दोघे रेसिंग संघाचा सामना पाहण्यासाठी जातात. स्टेडियममधील गर्दीतही गोमेझला शोधून काढतात. तेवढ्यात झालेल्या गोलमुळे झालेल्या गोंधळात गोमेझ निसटतो; पण मैदानात घुसतानाच त्याला पोलीस पकडतात. चौकशी करताना इरीन त्याची कामांध नजर पाहून त्याला चिथावत त्याच्या पुरुषत्वावर शंका उपस्थित करुन त्याचा कबुलीजबाब वदवून घेते. गोमेझवर खटला चालतो, शिक्षा सुनावली जाते; पण बेंजामीनचा प्रतिस्पर्धी रोमानो त्याला लगेच जामिनावर सोडवतो आणि सत्ताधारी राजकीय पक्षासाठी सुपारीबाज मारेकरी म्हणून नेमतो. बेंजामीन, इरीन काहीच करु शकत नाहीत. बेंजामीन रिकार्डोला स्पष्ट करतो, की लिलियानाच्या अपराध्याला कधीच शिक्षा होणार नाही. नंतर पाब्लोची बारमध्ये नशेत हाणामारी होते म्हणून बेंजामीन त्याला त्यारात्री आपल्या घरी ठेवून त्याच्या पत्नीला आणायला जातो. परत येईपर्यंत पाब्लोची गोळ्या घालून हत्या झालेली असते. नंतर समजते की रोमानोच्या कटामुळे पाब्लोने मित्राच्या रक्षणासाठी मारेकर्यांपुढे तोच बेंजामीन असल्याचे भासवले होते. त्यामुळे बेंजामीन 10 वर्षे अज्ञातवासात राहून परततो, तोपर्यंत गोमेझ गूढपणे गायब तर इरीन दोन मुलांची आई असते.
तपासाचा शेवट
1999, बेंजामीन डोक्यातील लिलियानाचे भूत उतरले नसल्याने 1975 पासूनच रहात असलेल्या निर्जन भागात रिकार्डोच्या घरी जातो. तपासाचा अन्यायकारक शेवट कसा सहन केला, असे विचारल्यावर रिकार्डो कबूलतो की त्याने त्यावेळीच गोमेझची हत्या केली होती. ते ऐकल्यावर बेंजामीन तिथून निघतो; पण त्याची तर ’गोमेझला सहज मृत्यू मिळू नये’ अशी इच्छा होती; हे आठवल्याने तो हळूच मागील दारी जातो तर धक्काच बसतो, की त्याने गोमेझला 24 वर्षे पूर्ण एकांतात डांबून त्याच्याशी एका शब्दानेही बोलला नव्हता. या भयानक शिक्षेने गोमेझ तडफडतोय. तेव्हा बेंजामीनला रिकार्डो स्मरण करुन देतो की, त्याने अपराध्याला ’जन्मठेपेची शिक्षा’ देण्याचे वचन दिले होते. तेव्हा मनावरील ओझे हलके झाल्याने बेंजामीन आपल्या प्रेमाची कबुली देण्यास इरीनच्या कार्यालयात जाण्यास सज्ज होतो. ज्याची तिला आयुष्यभर अपेक्षा होती.
70 च्या दशकातील अर्जेंटिनाच्या लष्करी हुकूमशाही, राजकीय अस्थिरता, हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जुआन कॅम्पनेला या सिद्धहस्त दिग्दर्शकाने पात्रांचे डोळे, नजर, अव्यक्त भावना, अंतस्थ सुप्त इच्छा, अपराधबोधाला अनपेक्षित थरारक वळणे देत मनोवैज्ञानिक, प्रतीकात्मक, रहस्यपूर्ण, रंजकतेने मांडत पहिल्या डिजिटल चित्रीत विदेशी भाषिक आस्कर सोबत 50 इतर पुरस्कार जिंकले. प्रेमळ स्मृतींचा भूतकाळ उबदार, पिवळसर रंगात तर वर्तमानातील एकटेपण फिकट, थंड रंगात. डोळ्यांतील प्रेम, भीती, सूड अशा भावनांसाठी अति क्लोज-अप शॉट्स, संवादापेक्षा जास्त बोलके ठरतात. मैलाचा दगड ठरलेले फुटबॉल सामन्याचे स्टेडियममधील सलग 6 मिनिटांचे दृश्य प्रेक्षकांनाही थरारक पाठलागात सामिल करते.
रिकार्डोचे सूडकृत्य
सूड, जीवापाड मैत्री आणि अव्यक्त प्रेमकथेसोबत एका अप्रतिम राजकीय रूपककथेत सरकारी हिंसेच्या विकृतीचा प्रतीकात्मक बेबंद अवतार ’गोमेझ’ तर न्यायापासून वंचितांचे अंधकारमय, आभासी समाधान आहे रिकार्डोचे ’सूडकृत्य’. याच भ्रष्ट राजकीय व्यवस्थेमुळे पाब्लोचा बळी जाऊन बेंजामीनला जीवाच्या भितीने कित्येक वर्षे अज्ञातवासात जावे लागते. अराजकतेच्या अनेक थरांत खोल लपलेले सत्य शोधणे किती कठीण, याच गोंधळाचा फायदा घेत गोमेझसारखे गुन्हेगार कसे निसटतात, हे फुटबॉल सामना स्पष्ट करतो. अर्जेंटिनातील नावावरुन सामाजिक स्तर दिसतात. बेंजामीन एस्पोसिटो सामान्य, कामगार वर्गातील लिपिक, जो इरीन हेस्टिंग्स या सुशिक्षित, उच्चभ्रू, वरिष्ठ पदावरील महिलेच्या कौटुंबिक प्रतिष्ठीत जगाकडे आकर्षित, पण उच्च दर्जापुढे प्रेम भावना व्यक्त करण्यात कायमच हतबल. हा वर्गभेद 70 च्या दशकातील अर्जेंटिनाच्या कठोर समाजाचेच प्रतिबिंब आहे.
रिकार्डोने गोमेझला अंधार्या खोलीत कैद करुन ठेवणे, ही केवळ शिक्षा नसून त्याच्या गुन्ह्याची जाणीव जागी ठेवत रिकामे आयुष्य जगायला लावणे म्हणजे मृत्यूदंडापेक्षा क्रूर, जिवंतपणी मरण यातना देणारा सूडच. बेंजामीनला पाहताच गोमेझ गयावया करतो, त्याला निदान माझ्याशी बोलायला तरी सांगा; परंतु ही शिक्षा जितकी गोमेझची होती, तितकीच रिकार्डोचीही होती. पत्नीच्या अपराध्याला 25 वर्षे कैदेत ठेवण्याच्या नादात स्वतःही भूतकाळात कायमचा बंदी बनून राहतो.
सुरुवातीला बेंजामीन कागदावर TEMO (मला भीती वाटते) लिहितो. हा शब्द त्याची स्वतःची भीती, वर्गभेदाची दरी, इरीनला मनातील भावना न सांगू शकल्याची खंत आहे. पण शेवटी जुना टाईपरायटर महत्वाचे पात्र बनून मार्ग दाखवतो. त्यात ’Aअक्षर गायब असल्याने तो TEMO मधील ’ए’ आणि ’च’ च्या मध्ये ’A’पेनाने लिहितो, ज्यामुळे तो शब्द TEMO (माझे तुझ्यावर प्रेम आहे) बनतो आणि आयुष्याची दिशा बदलते. भूतकाळातील भीती विसरुन अखेर इरीनसमोर आपल्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवतो. यामुळे केवळ खुनाचा तपासच नाही, तर स्वतःच्या अपूर्ण आयुष्याला पूर्णत्व देतो. जसे इरीनचे लाल रंगी पोशाख तिच्या उत्कट मनाचे चैतन्य, बेंजामीनला चुंबकासम आकर्षणारे प्रतीक, तर दुरुस्त करु पाहतो तो तुटलेला’A सदोष न्यायव्यवस्थेचे प्रतिबिंब आहे.
त्यांच्या डोळ्यांमधील रहस्य अगदी समर्पक शिर्षक आहे, कारण पटकथेतील प्रत्येक महत्त्वाचे वळण डोळ्यांद्वारेच समोर येते. डोळे अंतस्थ हेतू लपवू शकत नाहीत. बेंजामीनला जुन्या छायाचित्रांत गोमेझचे खरे रुप चेहर्यावरुन नाही, तर ’विकृत नजरेतून’ समजते. बेंजामीन, इरीनने 25 वर्षे शब्दांत प्रेम व्यक्त केले नाही; परंतु त्यांचे एकमेकांशी नजरानजर, अज्ञातवासात जाण्यापूर्वी एकमेकांचा निरोप घेताना त्यांचे डोळे त्यांचे अथांग प्रेम अन् विरह स्पष्टपणे व्यक्त करतात. शिवाय बेंजामीन केवळ डोळ्यांत पाहूनच, रिकार्डोची पत्नीवरील चिरस्थायी प्रेमाची आर्तता ओळखतो, त्या दुःखाची तुलना स्वतःच्या गोठलेल्या प्रेमकथेसोबत करतो. गोमेझ छायाचित्रात लिलियानाकडे पाहतो तसाच बेंजामीनही छायाचित्रात इरीनकडे पाहताना दिसतो; परंतु दोघांच्या नजरेतील फरक लांडगा अन् हरीणी इतका स्पष्ट दिसतो. अंधार्या कोठडीतील गोमेझच्या डोळ्यांतील अंधार आणि रिकार्डोच्या डोळ्यांतील शून्य भाव, शब्दांशिवाय सर्व काही सांगून जातात. मानवी कथन आणि बाह्य वागणूक खोटी असेल, कारणमिमांसा करेल परंतु डोळे आणि नजरेची दिशा हेच अंतिम सत्य सांगतात. भ्रष्ट कायदेशीर व्यवस्थेत दडलेल्या गूढ रहस्यांचा शब्दांनी देखील सुगावा लागत नाही, त्यांचा उलघडा नजरेतून होतो. त्यासाठी डोळे हे सत्यान्वेषी आरशाचे काम करतात. याच डोळ्यांबाबत कविवर्य वृंद म्हणतात..
नैना देत बताय सब,
हिए को हेत-अहेत।
जैसे निर्मल आरसी,
भली बुरी कहि देत॥
Related
Articles
मेस्सीच्या निवृत्तीने चाहते भावूक; आठवणींचा प्रवास पुन्हा चर्चेत
02 Sep 2026
इराण-अमेरिकेत पुन्हा संघर्ष
01 Sep 2026
सक्तीची हिंदी भाषा परीक्षा अधिकार्यांसाठी रद्द
03 Sep 2026
वाचक लिहितात
02 Sep 2026
’डीजे’विरूद्ध नागरिकांचा संताप
31 Aug 2026
जर्मनी चौथ्यांदा विश्वविजेते
01 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?