E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वाकडमध्ये विवाहितेची आत्महत्या
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
मालमत्तेतील हिश्श्यासाठी सासरकडून छळ
पिंपरी
: पिंपरी-चिंचवडच्या वाकड येथील एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. शिल्पा सचिन गवारे (वय-३२) असे मृत विवाहितेचे नाव आहे. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने माहेरच्या लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याप्रकरणी शिल्पा यांच्या भावाने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पती सचिन गवारे, सासरे आणि दीर यांच्याविरोधात हुंडाबळी तसेच कौटुंबिक छळवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा यांचा विवाह वाकड परिसरातील उच्चभ्रू गवारे कुटुंबात झाला होता. लग्नानंतर काही काळातच सासरच्या मंडळींकडून शिल्पा यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. माहेरच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागून घे, असा तगादा पती आणि सासरच्या लोकांनी लावला होता. माहेरून संपत्ती आणण्यासाठी तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता. यावरून तिला वारंवार मारहाण आणि शिवीगाळ केली जात असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. सततचा छळ आणि मारहाणीला कंटाळून शिल्पा यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला घडलेल्या घटनेमुळे हळहळ
भावा-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनच्या अवघ्या एक दिवसाआधी शिल्पाने आयुष्य संपवल्यामुळे तिच्या दोन भावांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ज्या हाताने भावाला राखी बांधायची होती, त्याच हातांनी जगाचा निरोप घेतल्याने परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाइकांनी केली आहे.
Related
Articles
डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन
30 Aug 2026
कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार
04 Sep 2026
साखरेचे घाऊक दर घसरले; शेवगावात मात्र किलोमागे ६५ रुपये
31 Aug 2026
पौराणिक देखाव्यांनी सजणार यंदाचा गणेशोत्सव
04 Sep 2026
न्यायाधीशांच्या बंगल्यावर चोरट्यांचे लक्ष्य
31 Aug 2026
कचरा उत्पादक मोठे; प्रक्रिया यंत्रणांची तपासणी मात्र कागदावरच
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?