E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सैनिकांसाठी पद्मश्री राहीबाईंच्या बीज-राख्या
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
अकोले (वार्ताहर) : राखीपौर्णिमेनिमित्त विषमुक्त गावरान बियाण्यांच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी देशाच्या सीमेवर लढणार्या सैनिकांसाठी तसेच बंधूस्थानी मानलेल्या मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी यंदाही स्वतःच्या हाताने बीज-राख्या तयार करून पाठविल्या आहेत. या उपक्रमातून त्यांनी देशबांधवांना पर्यावरण रक्षण व अन्नसुरक्षेचा संदेश दिला.
कोंभाळणे येथे राहीबाईंनी कुटुंबीय व नातवंडे सायली आणि धनश्री यांच्या मदतीने या पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या. भात, नागली, वरई, तूर, मूग, उडीद, वाल, काकडी, घोसाळी व भोपळा आदी पारंपरिक बियाण्यांचा वापर करून राख्या साकारण्यात आल्या. राखी बांधल्यानंतर तिच्यातील बीज जमिनीत रुजवून त्यातून पीक किंवा भाजीपाला उगवावा, हा या उपक्रमामागील संकल्प आहे.महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यांपर्यंत गावरान बियाणे पोहोचविणार्या राहीबाई सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी बीज-राख्या पाठवितात.रक्षाबंधनाच्या कौटुंबिक भावनेसोबत बीज-राखीतून पर्यावरण संवर्धन, विषमुक्त अन्न आणि राष्ट्रबांधणीचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Related
Articles
शासकीय बैठका, कार्यक्रम आणि कार्यालयातील उपहारगृहात आता आरोग्यदायी अन्नपदार्थ
02 Sep 2026
कथा नारदाची, व्यथा कुंभकर्णाची
07 Sep 2026
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीला मुदतवाढ देण्याचा निर्णय
02 Sep 2026
कार्लोस अल्काराझचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
08 Sep 2026
सेरेना-व्हिनस यांची झुंज अपयशी
06 Sep 2026
सतरा कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त
07 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार