E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मराठी शाळांच्या सुधारणेसाठी धाडसाने पुढे या : विश्वास पाटील
Samruddhi Dhayagude
28 Aug 2026
लोणी : मराठी शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज असून, मराठी शाळा आणि ग्रंथालये ही मायमराठीची खरी वस्त्रे आहेत. मराठीसाठी धाडसाने काम करण्याचे आवाहन ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले.पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय साहित्य, कलागौरव व प्रबोधन पुरस्कारांचे वितरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांना साहित्य जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पाटील यांनी मराठी शाळांना आपली खरी मंदिरे संबोधत, जिल्हा परिषद शाळा गरुडासारखी उंच भरारी घेत असल्याचे सांगितले.तुमच्या खांद्यावर झेंडा कोणताही असू द्या, दांडा मात्र मराठीचाच ठेवा,असे आवाहन त्यांनी केले.सुनेत्रा पवार यांनी विखे परिवाराशी असलेले जुने आणि जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत साहित्यिक व कलाकारांचा सन्मान समाजाला प्रेरणा देणारा असल्याचे सांगितले.
उत्तम कांबळे यांनी पुरस्कारामुळे साहित्यिकांना बळ मिळते आणि समाज अक्षरांच्या मागे उभा राहतो, हे या सन्मानाने सिद्ध केले असल्याचे सांगितले. समाजासाठी लिहिणार्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संदेश पुरस्कारातून मिळतो, असेही त्यांनी नमूद केले. उद्याचा समाज गतिरोधक वाटू नये, यासाठी मार्गदर्शनाचा कंदील निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रवरा परिवाराच्या ३६ वर्षांच्या साहित्य पुरस्कार परंपरेचा आढावा घेतला. मराठी साहित्य, कला व संस्कृतीची अभिरुची जपण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, आमदार सर्वश्री काशिनाथ दाते, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, संग्राम जगताप, अमोल खताळ, प्राजक्त तनपुरे, आमदा मोनिका राजळे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे, अध्यक्ष डॉ. सुजय विखे, सौ. शालिनीताई विखे, ध्रुव विखे, अविनाश आदिक, सौ. अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Related
Articles
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
02 Sep 2026
शेअर बजाराची घसरगुंडी सुरूच
08 Sep 2026
निवडणूक न लढवताच सहा पक्षांच्या खात्यात १ हजार ५०० कोटी
07 Sep 2026
भारतीय मोबाईल निर्मितीला ६२,५०० कोटींचे बळ
08 Sep 2026
पुण्यातून जगभरात पोहचले बाप्पा
03 Sep 2026
हम रह गये अकेले
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार