E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जीआयएस,जीपीएस मॅपिंगद्वारे होणार शहरात वृक्ष गणना
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
पिंपरी
: महापालिकेच्या वतीने शहरातील झाडांची पुन्हा गणना करण्यात येणार आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या वृक्षगणनेसाठी महापालिकेने तब्बल 6 कोटी 76 लाख रुपये खर्च केले होते. खासगी एजन्सीमार्फत सॅटेलाईटच्या माध्यमातून करण्यात आलेल्या या गणनेत शहरात 32 लाख 16 हजार 799 वृक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, हे काम वादाच्या भोवर्यात सापडले.आता पुन्हा नव्याने वृक्षगणना करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने निविदा प्रसिद्ध केली असून, यावेळी जीआयएस आणि जीपीएस आधारित मॅपिंगच्या माध्यमातून झाडांची अचूक संख्या आणि माहिती संकलित केली जाणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीने 27 सप्टेंबर 2017 रोजी शहरातील वृक्षगणनेला मंजुरी दिली होती. हे काम सात वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामाच्या कालावधीबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच संबंधित ठेकेदार एजन्सीचे बिल अदा करण्यात आले. मागील गणनेनुसार शहरात 32 लाख 16 हजार 799 झाडे असल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच एका झाडाच्या मोजणीसाठी सरासरी सुमारे 10 रुपये खर्च झाला. यापूर्वी 2003-04 मध्ये मानवी पद्धतीने करण्यात आलेल्या वृक्षगणनेसाठी एका झाडामागे 2 रुपये 35 पैसे खर्च झाले होते आणि एकूण सुमारे 39 लाख रुपये खर्च आला होता. मागील वृक्षगणनेत केवळ झाडांची संख्या मोजणे अपेक्षित नव्हते, तर झाडांचे छायाचित्र, उंची, रुंदी, ठिकाण, स्थिती, क्रमांक तसेच वृक्षारोपणाची व्याप्ती यासह विविध माहिती संकलित करण्याचे नियोजन होते.
यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अपेक्षित स्वरूपात काम झाले नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. या प्रकरणी उद्यान विभागाने संबंधित एजन्सीला नोटीस बजावली होती; मात्र त्यानंतर ठोस कारवाई झाली नसल्याचे समोर आले.आता महापालिका पुन्हा शहरातील झाडांची गणना करणार असून, जीआयएस किंवा जीपीएस आधारित भौगोलिक मॅपिंग करून प्रत्येक झाडाची माहिती नोंदविण्यात येणार आहे. या कामासाठी इच्छुक एजन्सीकडून प्रस्ताव मागविण्यात आले असून 9 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रस्ताव सादर करता येणार आहेत. नव्या वृक्षगणनेसाठी पुन्हा कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याने मागील गणनेत झालेल्या त्रुटी यावेळी टाळल्या जाणार का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचे मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे यांच्या माहितीनुसार, शहरातील झाडांची दर दहा वर्षांनी गणना केली जाते. यंदा ही गणना करण्यात येणार असून सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर शहरातील झाडांची विविध प्रकारची माहिती उपलब्ध होणार आहे. मागील आकडेवारीनुसार, ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात 3 लाख 6 हजार 94, ‘ब’मध्ये 4 लाख 62 हजार 137, ‘क’मध्ये 3 लाख 51 हजार 173, ‘ड’मध्ये 5 लाख 12 हजार 368, ‘ई’मध्ये 8 लाख 43 हजार 824 आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात 7 लाख 41 हजार 203 झाडे असल्याची नोंद होती. यामध्ये ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वाधिक, तर ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयात सर्वात कमी झाडांची संख्या नोंदविण्यात आली होती. एकूण वृक्षसंख्या 32 लाख 16 हजार 799 इतकी होती.
Related
Articles
टी-२० कर्णधारपदावरून हटवले तेव्हा धक्का बसला : सूर्यकुमार
31 Aug 2026
ध्रुव सितवाला याने पटकावले रौप्यपदक
03 Sep 2026
तोतया न्यायाधीशाला आठ वर्षांची शिक्षा
31 Aug 2026
जाहीर केलेला विकास दर योग्यच
03 Sep 2026
एसआरआय अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार
04 Sep 2026
भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंड दौरा; कसोटी मालिकेपूर्वी चार दिवसीय सामने
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?