E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
‘त्या’ दोन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करा
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
मृतांच्या वारसांना 50 लाख रुपये अर्थसाह्य देण्याची मागणी
पिंपरी
: निगडीतील बीएसएनएल डक्टमध्ये 2 तरुण कामगारांना रात्री बाराच्या नंतर कामाला लावण्यात आले त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही आणि त्यांचा मृत्यू झाला, वर्षभरानंतर पुन्हा दुसरी घटना घडली यात दोषी महापालिका, बीएसएनएल अधिकारी, ठेकेदार या सर्वांवर कडक कारवाई करा, मृतांच्या वारसांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य द्या अन्यथा लवकरच आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निगडी प्राधिकरण परिसरातील बीएसएनएल च्या भूमिगत इन्स्पेक्शन डक्टमध्ये कामासाठी उतरवलेल्या दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.बी एस एन एल इन्स्पेक्शन डक्टमध्ये काही कामानिमित्त दोन तरुण कामगार उतरले होते. यात मनोज बाबुराव शिंदे वय 26 अमोल अशोक शिंदे वय 20 यांचा मृत्यू झाला. कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
डक्टमध्ये ऑक्सिजनची कमतरता, विषारी वायू किंवा अन्य कारणामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता असली तरी मास्क, ऑक्सिजन व सुरक्षा साधनांचा वापर केला गेला नाही.विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी 15 ऑगस्ट 2025 याच ठिकाणी अशाच स्वरूपाची दुर्घटना घडली होती. यात लखन धावारे, दत्ता होणारे, साहेबराव गिरशेटे या तीन जणांचा मृत्यू झाला होता. याबाबत कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे 20 ऑगस्ट रोजी बीएसएनएल कार्यालय चिंचवड येथे आंदोलन केले होते. आता घडलेल्या घटनेतील दोषीवर त्वरित कारवाई करावी अन्यथा लवकरच बीएसएनएल व महापालिका कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Related
Articles
जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचे आरोप
07 Sep 2026
नऊ दिवस मृत्यूशी झुंज
05 Sep 2026
टेंभुर्णी पोलिसांचा मोठा दणका; २५ चोरीच्या दुचाकी जप्त
02 Sep 2026
नेदरलँड्सने ८६ टन सोने लंडनला हलवले
05 Sep 2026
शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची पसंती
02 Sep 2026
ओबीसींच्या हिताला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरणार : भुजबळ
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार