E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाकसईजवळ मोटारीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
चालक जखमी
लोणावळा
(वार्ताहर) : जुना पुणे-मुंबई महामार्गावर वाकसई गावच्या हद्दीत एका भरधाव कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर कारचालक जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास सूरज ढाब्यासमोर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकी कार (क्र. चक 12 चइ 6541) चा चालक अनिकेत गौतम बरखा (रा. मोशी, ता. हवेली, जि. पुणे) हा वाहन भरधाव वेगाने आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता.
सूरज ढाब्यासमोर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला (डिव्हायडर) जोरात धडकली आणि लगतच्या खड्ड्यात जाऊन पडली. या भीषण अपघातात कारमधील हुसैन शेख व आसीर इनामदार (दोघांचे पूर्ण नाव व पत्ता उपलब्ध नाही). अपघातात कारचालक अनिकेत बरखा हा स्वतः जखमी झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे.या घटनेप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गोकुळ भास्कर खेडकर (ब. नं. 3211) यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी चालक अनिकेत बरखा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (इछड) कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब), 324(5) आणि मोटार वाहन कायदा कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Related
Articles
ज्या हिंदूला भारतात मुस्लिमांना स्थान नाही असे वाटते, तो हिंदू नाही
31 Aug 2026
महाप्रसादाच्या ठिकाणांचीही तपासणी होणार
04 Sep 2026
बांगला देशही मक्का करारात ?
31 Aug 2026
युट्युबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता घेतले ताब्यात
03 Sep 2026
खर्या शत्रूला ओळखा
31 Aug 2026
शेअर बाजार पुन्हा घसरला
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?