E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
यस्तिका आणि अनुष्का भारत ‘अ’ संघाचे कर्णधार
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
नवी दिल्ली
: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) महिला निवड समितीने ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघाच्या आगामी भारत दौर्यासाठी भारतीय ‘अ’ संघांची घोषणा केली आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत अनुष्का शर्मा भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व करणार असून, एकदिवसीय आणि बहुदिवसीय संघाची धुरा यस्तिका भाटियाकडे सोपविण्यात आली आहे.
टी-20 मालिकेसाठी सयाली साठघरे हिची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर अनुष्का शर्मा एकदिवसीय आणि बहुदिवसीय संघांची उपकर्णधार असेल. ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघाचा भारत दौरा 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दौर्यात तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि एक चार दिवसीय सामना खेळविण्यात येणार आहे. टी-20 सामने न्यू चंदीगड येथे, एकदिवसीय सामने मोहालीतील पीसीए स्टेडियमवर, तर चार दिवसीय सामना धर्मशाला येथे होणार आहे. टी-20 सामने 12, 15 आणि 17 सप्टेंबर रोजी खेळविण्यात येतील.
त्यानंतर 20, 23 आणि 25 सप्टेंबर रोजी मोहाली येथे एकदिवसीय सामने होतील. दौर्यातील चार दिवसीय सामना 29 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान धर्मशाला येथे खेळविण्यात येणार आहे.टी-20 मालिकेसाठी संघ : अनुष्का शर्मा (कर्णधार), सयाली साठघरे (उपकर्णधार), वृंदा दिनेश, सुजाता डे, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, शिप्रा गिरी, श्वेता सहरावत, उमा छेत्री, तनुजा कंवर, मीनू मणी, वैष्णवी शर्मा, जिंतिमनी कलिता, शबनम शकील, सिमरन दिल बहादूर.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ : यस्तिका भाटिया (कर्णधार), अनुष्का शर्मा (उपकर्णधार), वृंदा दिनेश, प्रिया पुनिया, तनिषा सिंह, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, उमा छेत्री, मीनू मणी, अमनदीप कौर, वैष्णवी शर्मा, सयाली साठघरे, जिंतिमनी कलिता, शबनम शकील, अक्षिता भगत.
बहुदिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघ : यस्तिका भाटिया (कर्णधार), अनुष्का शर्मा (उपकर्णधार), शुभा सतीश, प्रिया पुनिया, तनिषा सिंह, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, ममता माडिवाला, श्रीमती दिब्यदर्शिनी, शुची उपाध्याय, वैष्णवी शर्मा, सयाली साठघरे, जिंतिमनी कलिता, शबनम शकील, अक्षिता भगत.
Related
Articles
मुंबई सहकारी मंडळावर ‘सहकार पॅनेल’चा झेंडा
05 Sep 2026
नंदीग्रामसह सहा जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर
08 Sep 2026
बेन स्टोक्स आता ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये दिसणार; अॅडलेड स्ट्रायकर्सकडून करार
02 Sep 2026
कोंढव्यात अमली पदार्थांविरोधात पोलिसांचा दुहेरी ‘स्ट्राईक’
02 Sep 2026
दुष्काळ आणि अल निनोमुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर करा
08 Sep 2026
एकदा सांगच माधवा, तुझ्यातल्या ऊर्जेचं रहस्य?
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार