E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
मुचोवा-मेंसिक यांची मिश्र दुहेरीत बाजी
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
अमेरिकन ओपन स्पर्धा
न्यूयॉर्क
: कॅरोलिना मुचोवा आणि याकुब मेंसिक या झेक प्रजासत्ताकाच्या जोडीने बेलिंडा बेनसिच आणि फ्लावियो कोबोली यांचा 6-3, 1-6, 10-6 असा पराभव करून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले.दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेच्या दुसर्या दिवशी मुचोवा-मेंसिक जोडीने दोन्ही सामने मॅच टायब्रेकरमध्ये जिंकले. मेंसिकची वेगवान सर्व्हिस आणि नेटजवळील प्रभावी खेळ या विजयात निर्णायक ठरला. मेंसिकने ‘एस’ लगावत अंतिम सामन्याचा शेवट केला. विजेत्या जोडीला 10 लाख डॉलरची बक्षीस रक्कम मिळाली.
उपांत्य फेरीतही मुचोवा-मेंसिक जोडी पराभवाच्या उंबरठ्यावर होती. मात्र, दोन मॅच पॉइंट वाचवल्यानंतर त्यांनी सलग चार गुण जिंकत मीरा आंद्रीवा आणि आंद्रे रुबलेव्ह यांचा 5-4, 3-5, 11-9 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामना हा स्पर्धेतील एकमेव सामना पारंपरिक टेनिस पद्धतीने खेळविण्यात आला. यात प्रत्येक सेट सहा गेमचा होता आणि 6-6 अशा बरोबरीनंतर टायब्रेकर खेळविण्यात आला. सुरुवातीच्या तीन फेर्यांमध्ये मात्र सेट चार गेमचे होते आणि 4-4 बरोबरीनंतर टायब्रेकर झाला.दरम्यान, बेनसिच आणि कोबोली यांनी पहिल्या उपांत्य फेरीत एलिना स्वितोलिना आणि गेल मोनफिल्स या पती-पत्नीच्या जोडीचा 4-5, 4-1, 10-5 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
Related
Articles
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा इशारा
03 Sep 2026
सीजेपीच्या आंदोलनामागील शक्ती ओळखा
01 Sep 2026
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत भाविकांची रीघ
01 Sep 2026
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी अनीश सहस्रबुद्धे पंच
31 Aug 2026
विधी संघर्षग्रस्त बालकांना नवजीवनाचा संदेश
31 Aug 2026
सेबीचे सीएएस की तकेशीचा कॅसल?
31 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?