ऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग वाढवावा लागेल : मोदी   

नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिकमधील सहभाग काही मोजक्या क्रीडा प्रकारांपुरता मर्यादित न राहता अधिकाधिक खेळांमध्ये वाढविण्याची गरज आहे. गेल्या ऑलिम्पिकमध्ये २० हून अधिक क्रीडा प्रकारांत भारताचा सहभाग नव्हता. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. खेळ हा केवळ पदके जिंकण्याचा मार्ग नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, शिस्त निर्माण करण्याचे आणि देशाचा गौरव वाढविण्याचे माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले. क्रीडा मंत्रालयाच्या ‘खेलो इंडिया संवाद-खेळाची गोष्ट, पंतप्रधानांसोबत’ या उपक्रमांतर्गत मोदी यांनी देशभरातील दीड हजारांहून अधिक ठिकाणी असलेल्या तरुण आणि खेळाडूंशी आभासी माध्यमातून संवाद साधला. युवा पिढीला भारताच्या क्रीडा प्रवासाशी जोडणे आणि खेळांबाबत व्यापक जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

Related Articles