E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
सणांच्या हंगामासाठी पाच क्रेडिट कार्डस
Wrutuja pandharpure
28 Aug 2026
वृत्तवेध
सणांचा हंगाम जवळ येताच खरेदी, प्रवास, हॉटेल बुकिंग, बाहेरचे जेवण आणि ऑनलाइन शॉपिंगवरील खर्च वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी योग्य क्रेडिट कार्डचा वापर केल्यास नेहमीच्या खर्चावर कॅशबॅक, रिवॉर्ड आणि ट्रॅव्हल बेनिफिट मिळवता येऊ शकतात. मात्र, प्रत्येक कार्डाची वैशिष्ट्ये वेगळी असल्याने आपल्या खर्चाच्या पद्धतीनुसार कार्ड निवडणे महत्त्वाचे आहे. सध्या ट्रॅव्हल, ऑनलाइन शॉपिंग, डायनिंग आणि युटिलिटी बिलांसाठी काही क्रेडिट कार्ड ग्राहकांना चांगले फायदे देतात. ट्रॅव्हल आणि डाइनिंगवर अधिक खर्च करणार्यांसाठी येस बँक पैसा बाजार पैसा सेव्ह रुपे क्रेडिट कार्ड हा एक पर्याय ठरू शकतो. निवडक ट्रॅव्हल आणि डाइनिंग व्यवहारांवर सहा टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. इतर पात्र व्यवहारांवर एक टक्का कॅशबॅक दिला जातो. या कार्डची जॉइनिंग फी शून्य असून बँकेच्या माहितीनुसार सध्या ते मर्यादित कालावधीसाठी लाइफटाइम फ्री म्हणून उपलब्ध आहे. ऑनलाइन खरेदीवर अधिक खर्च करणार्यांसाठी अॅक्सिस बँक कॅशबॅक क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरू शकते. पात्र ऑनलाइन व्यवहारांवर खर्चाच्या प्रमाणानुसार सात टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळतो. पाच हजार रुपयांपर्यंतच्या खर्चावर दोन टक्के, पाच हजार रुपयांपेक्षा जास्त आणि 40 हजार रुपयांपर्यंतच्या खर्चावर पाच टक्के, तर त्यापुढील खर्चावर सात टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. ऑनलाइन शॉपिंग आणि फूड ऑर्डरिंगसाठी एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डही विचारात घेता येते. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा, स्विगी, झोमॅटो, उबर आणि बुकमायशोसारख्या निवडक ब्रँडवर पाच टक्के कॅशबॅक मिळतो. याशिवाय प्रत्येक तिमाहीत एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक खर्च केल्यास एक हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर किंवा देशांतर्गत विमानतळावरील एका लाउंज प्रवेशाचा पर्याय मिळू शकतो. युटिलिटी बिल, मोबाइल रिचार्ज आणि डाइनिंगवर खर्च जास्त असल्यास आयसीआयसीआय बँक अॅमेझॉन क्रेडिट कार्डचा विचार करता येतो. प्रवासावर अधिक खर्च करणार्यांसाठी मेकमायट्रिप आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड हा ट्रॅव्हल-केंद्रित पर्याय आहे. या कार्डच्या वापरामुळे मेकमायट्रिपवरील बुकिंगवर सहा टक्क्यांपर्यंत माय-कॅश, तर इतर किरकोळ खर्चावर एक टक्का माय-कॅश मिळू शकतो. या कार्डाची जॉइनिंग आणि वार्षिक फी 999 रुपये अधिक जीएसटी इतकी आहे.
Related
Articles
आरोग्य विभागाला सुविधांची प्रतीक्षा
31 Aug 2026
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृत दिन उत्साहात
30 Aug 2026
नागरिकत्वावरील ट्रम्प यांच्या आदेशाला पुन्हा स्थगिती
04 Sep 2026
शिरूर मतदारसंघात १ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली
04 Sep 2026
जीएसटी संकलन घटले
02 Sep 2026
वाई औद्योगिक वसाहतीत भीषण आग
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?