E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
‘नबी की आमद मरहबा’ने दुमदुमले सोलापूर
सोलापूर, (प्रतिनिधी) : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादुन्नबी सोलापूर शहरात पारंपरिक उत्साह, भक्तिमय वातावरण आणि सामाजिक सलोख्याच्या संदेशात साजरी करण्यात आली. विजापूर वेस येथून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत हजारो मुस्लिम बांधवांसह लहान मुले, तरुण आणि आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.विजापूर वेस येथे सकाळी 9 वाजता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडा फडकावून मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला. मिरवणूक मार्गावर विविध मंडळांकडून आकर्षक सजावट, स्वागत कमानी आणि धार्मिक देखावे उभारण्यात आले होते. प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जीवन व शिकवणीवर आधारित ‘नात-ए-पाक’ सादर करत विविध मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली होती.
मागील पाच दिवसांपासून शहरातील विविध भागांत धार्मिक कार्यक्रम, प्रवचने आणि नात-ए-पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ‘आका का मिलाद आया’, ‘नबी की आमद मरहबा’ अशा घोषणांनी मिरवणूक मार्ग उत्साहाने दुमदुमून गेला.मिरवणुकीचे शहरातील विविध भागांत नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सहभागी बांधवांसाठी पाणी, शरबत आणि खाद्यपदार्थांचे वाटप करण्यात आले. अनेक ठिकाणी दिवसभर खिचडा, तहारी आणि मिठाई वाटपाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामुळे मिरवणुकीच्या माध्यमातून सामाजिक बंधुभाव आणि एकोप्याचे दर्शन घडले.
मिरवणुकीत शहर काजी मुफ्ती अमजदअली सय्यद, उत्सव अध्यक्ष समीर शेख व कम्मो शेख,आरिफ शेख, राज्य अल्पसंख्याक सदस्य वसीम बुर्हाण,एम.डी.शेख, राजू कुरेशी,यु.एन.बेरिया, मकबूल मोहोळकर, मतीन बागवान,शकील मौलवी, पिरअहमद शेख,यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते. पार्श्वभूमीवर मध्यरात्रीपासूनच शहरातील विविध मशिदी व धार्मिक स्थळांवर धार्मिक कार्यक्रम सुरू होते. यंदा प्रथमच विजापूर वेस परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
Related
Articles
जयपूरमधील जीर्ण शाळा पाडली
03 Sep 2026
शासकीय बैठका, कार्यक्रम आणि कार्यालयातील उपहारगृहात आता आरोग्यदायी अन्नपदार्थ
02 Sep 2026
हनुमान अंश चित्रपटाचा १५० कोटींचा व्यवसाय
08 Sep 2026
ग्रामीण भागात सिलिंडर बुकिंगचा कालावधी बदलला
08 Sep 2026
गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटला बंदी
04 Sep 2026
जिल्ह्यातील 3 हजार 488 शाळांना 7 कोटी 39 लाखांचे अनुदान
02 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार