E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
सोलापूर : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास वाढवून त्यांना दैनंदिन जीवनात सहजपणे इंग्रजी संभाषण करता यावे, या उद्देशाने दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मांडलेल्या अभिनव उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी कौतुक केले.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निजी कक्षात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सनी चव्हाण तसेच दक्षिण सोलापूर गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके, मल्लिनाथ स्वामी तसेच निवडक इंग्रजी शिक्षक उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते इंग्रजी शिक्षण न देता प्रत्यक्ष व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे. परिपाठामध्ये इंग्रजी भाषेत भाषण, सुविचार, बातमी वाचन, संवाद सादरीकरण यांसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.शाळांमध्ये इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, इंग्रजी फलक लेखन, दररोज मराठीसोबत इंग्रजी सुविचार लेखन तसेच विद्यार्थ्यांमध्ये दैनंदिन इंग्रजी संभाषणाची सवय निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढण्यासोबतच इंग्रजी बोलण्याची भीती दूर होऊन आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. या उपक्रमातील विशेष संकल्पना म्हणजे ‘इंग्रजी स्टार रेटिंग’. शाळेतील किती टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये सहज संवाद साधू शकतात, याच्या आधारे शाळांना स्टार रेटिंग देण्याची संकल्पना आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करून उत्कृष्ट कामगिरी करणार्या शाळांचा गौरव करण्यात येणार आहे.
‘‘हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेचा आत्मविश्वास निर्माण करणारा असून प्रेरणादायी आहे. प्रथम दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवावा. त्याचे सकारात्मक परिणाम आणि अनुभव लक्षात घेऊन पुढील टप्प्यात संपूर्ण जिल्ह्यात या उपक्रमासाठी मार्गदर्शन करण्यात यावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सांगितले.
Related
Articles
चायना मास्टर्समध्ये उन्नती हुडाचा पराभव; हरिहरन-अर्जुनची सामन्यातून माघार
02 Sep 2026
‘महाजेनको’ने काढलेली कोळसा खरेदीची निविदा रद्द करा
04 Sep 2026
एनआयएच्या आरोपपत्राची दिल्ली न्यायालयाकडून दखल
30 Aug 2026
विमानतळावर टॅक्सी प्रवाशांची लाखोंची लूट
03 Sep 2026
इतिहासाला नवे पंख एअर व्हाइस मार्शल शक्ती शर्मा
03 Sep 2026
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
30 Aug 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?