राशीन : लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगरातील ड्रेनेज लाइन चोकअप, साचलेले पाणी, दुर्गंधी व घाणीच्या समस्येबाबत वृत्त प्रसिद्ध होताच ग्रामपंचायतीने तातडीने दखल घेतली. ग्रामविकास अधिकारी तथा प्रशासक रोहिदास कापरे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ड्रेनेज लाइन साफ करण्याचे काम सुरू करण्यात आले.प्रशासक कापरे यांनी घटनास्थळी भेट देवून कर्मचार्यांना आवश्यक सूचना दिल्या. नागरिकांनी परिसर स्वच्छ ठेवावा, ग्रामपंचायतीकडून आवश्यक सहकार्य केले जाईल, असे त्यांनी सांगितले. जुना कुंभारगाव रोड तसेच मुख्य बाजारपेठेतील स्वच्छतेचे कामही लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे, अमोल जाधव, महेश उर्किे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला. माध्यमांच्या वृत्तांकनामुळे प्रश्नाला वाचा फुटून ड्रेनेज सफाई सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
Fans
Followers