E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
टाकळीभानचा टेलटँक पूर्ण क्षमतेने भरला
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
टाकळीभान (वार्ताहर) : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानसह परिसरासाठी वरदान ठरलेला टाकळीभान टेलटँक (गोविंदसागर) पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टेलटँकच्या सांडव्यातून पाणी पाझर तलावाकडे झेपावले असून, लवकरच तोही भरण्याची शक्यता आहे. 1972 च्या दुष्काळात माजी कृषिमंत्री कै. गोविंदराव आदिक यांच्या प्रयत्नातून या टेलटँकची निर्मिती झाली. 197 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेल्या या टेलटँकमुळे परिसरातील सात ते आठ गावांतील शेतीला सिंचनाचा लाभ होतो. तसेच अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनांनाही त्याचा फायदा होतो.भंडारदरा व निळवंडे धरणे पूर्ण भरल्याने प्रवरा नदीत सोडण्यात आलेले ओव्हरफ्लोचे पाणी कालव्याद्वारे टेलटँकमध्ये सोडण्यात आले. जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्यांनी पंधरा दिवस परिश्रम घेतल्याने टेलटँक भरला. त्यामुळे शेतकर्यांना रब्बी पिकांचे नियोजन करता येणार असून त्यांनी जलसंपदा विभागाचे आभार मानले.
Related
Articles
पाकिस्तानात १५ बंडखोर ठार
04 Sep 2026
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा गुजरातमध्ये होणार
08 Sep 2026
मोबाइल उत्पादनासाठी 62 हजार कोटींची योजना
03 Sep 2026
कांदा साडेचार ते साडेपाच हजार रुपये
07 Sep 2026
'पुराच्या पाण्यात सापडलेली मासे खाऊ नका'
02 Sep 2026
जिल्हा परिषदेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार