E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
जुन्नरमध्ये आढळला दुर्मिळ ‘मोरपिशी सरडा’
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
रंगीबेरंगी पंखाची अनोखी नजाकत ठरतेय आकर्षण
सुरेश भुजबळ
जुन्नर : जुन्नर तालुक्याच्या ग्रामीण भागातील माळराने, गवताळ प्रदेश आणि डोंगरकपारींमध्ये निसर्गाची अनेक गुपिते आजही दडलेली आहेत. याच निसर्गसंपदेची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, जुन्नर तालुक्यातील पेमदरा येथे जगातील दुर्मीळ प्रजातींपैकी एक असलेला ‘मोरपिशी सरडा’ आढळून आला आहे. या सरड्याचे मनमोहक रूप वन्यजीवप्रेमी आणि निसर्ग अभ्यासकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘चमकदार गळ्याचा सरडा’ किंवा ‘पंख्यासारखा रंगीत गळा असलेला सरडा’ म्हणूनही ओळखल्या जाणार्या या जीवाचे शास्त्रीय नाव ‘सिताना पॉन्टीसेरियाना’ असे आहे. जगात या सरड्याच्या एकूण 12 उपप्रजाती असून, त्यापैकी पाच प्रजाती भारतात आढळतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळमध्ये त्याचे अस्तित्व असून महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील डोंगरावरील पठारी भागात त्याचा अधिवास आढळतो. हरिश्चंद्रगड, कळसुबाई परिसरासह जुन्नर तालुक्यातील काही ग्रामीण भागातही या दुर्मीळ सरड्याचे अस्तित्व दिसून येते.
खोडद येथील वन्यजीव तज्ज्ञ व पक्षी निरीक्षक सुभाष कुचिक यांनी या सरड्याबाबत माहिती देताना सांगितले की, मागील काही काळात या सरड्याची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, ही चिंतेची बाब आहे. प्रामुख्याने गवताळ प्रदेश, माळराने, टेकड्या आणि डोंगराळ भागात आढळणार्या या सरड्याचे खाद्य छोटे किडे, गोगलगाय, मुंग्या आणि वाळवी यांसारखे जीव आहेत.
या सरड्याचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण रूप त्याच्या मिलनाच्या काळात पाहायला मिळते. नर सरड्याच्या गळ्यापासून पोटापर्यंत नारंगी, काळा आणि निळ्या रंगांचा उठावदार पंख्यासारखा पडदा असतो. मादीला आकर्षित करण्यासाठी नर सरडा एखाद्या खडकावर, मातीच्या उंचवट्यावर किंवा छोट्या झाडाच्या उंच फांदीवर मागच्या दोन पायांवर उभा राहतो. शरीर ताठ करून छाती पुढे काढतो आणि आपला रंगीबेरंगी पंखा फुलवत मादीचे लक्ष वेधून घेतो.
विशेष म्हणजे या रंगीबेरंगी पंख्याचा उपयोग केवळ मादीला आकर्षित करण्यासाठीच होत नाही, तर आपल्या क्षेत्रावर वर्चस्व राखण्यासाठी नर सरडे एकमेकांना आव्हान देतानाही त्याचा वापर करतात. मादी सरड्याकडे मात्र असा पंखा नसतो. ती ठराविक काळाने सापाप्रमाणे कात टाकते, हे तिचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.जुन्नर तालुक्यातील पेमदरा येथे आढळलेला हा दुर्मीळ मोरपिसी सरडा त्यामुळे केवळ वन्यजीवप्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरलेला नाही, तर जुन्नरच्या माळरानात आणि डोंगरदर्यांमध्ये आजही समृद्ध जैवविविधता टिकून असल्याची जिवंत साक्ष ठरला आहे.छोटासा जीव असला तरी त्याच्या रंगीबेरंगी पंख्यामागे निसर्गाची अद्भुत रचना दडलेली असल्याने या दुर्मिळ जीवाचे दर्शन निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरत आहे.
Related
Articles
पुणे महापालिकेतील शिपायावर गुन्हा
06 Sep 2026
वायसीएम रुग्णालयात एफडीएचा छापा
02 Sep 2026
शीतल अंतिम फेरीत; सरिता कांस्यपदकाच्या लढतीत
08 Sep 2026
युट्युबर संतोष पंडित यांना पुणे पोलिसांनी मध्यरात्री १ वाजता घेतले ताब्यात
03 Sep 2026
शिरूर मतदारसंघात १ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली
04 Sep 2026
साडेपाच टन मदतीचे साहित्य भारताकडून नेपाळकडे रवाना
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार