E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निधी दिला; मात्र टोमण्यांची ‘व्याजासकट परतफेड’
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
प्रस्ताव मंजुरीनंतर बिडकरांचा राष्ट्रवादीला टोला
पुणे
: महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. कार्यपत्रिकेवरील प्रस्तावांच्या मंजुरीवरून दिवसभर विरोधकांना प्रतीक्षा करावी लागल्यानंतर अखेर सायंकाळी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निधीविषयक प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मात्र, या प्रस्तावांना मंजुरी देताना सभागृह नेते गणेश बिडकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ‘लेटर वॉर’चा संदर्भ देत राष्ट्रवादीच्या नेत्यांना टोले लगावले.
सभेचे कामकाज सुरू होताच सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांच्या प्रस्तावांना प्राधान्य देत ते मंजूर करण्यात येत होते. विरोधी पक्षांच्या प्रस्तावांचा क्रमांक मागे पडत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. आपले प्रस्ताव मंजूर होणार की आणखी प्रतीक्षा करावी लागणार, याबाबत काही नगरसेवकांनी सभागृह नेत्यांच्या बाकाकडे धाव घेतली.यावेळी ‘स’ यादीतील वर्गीकरणाचे विषय सुरुवातीला घेतले जात असून, तुमचेही विषय घेतले जातील, असे आश्वासन बिडकर देत होते. मात्र, प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाचे प्रस्ताव आधी आणि विरोधकांचे प्रस्ताव नंतर, अशीच कार्यवाही सुरू राहिल्याने विरोधकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
सायंकाळी उशिरा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे निधीविषयक प्रस्ताव मंजुरीसाठी आले. त्यावेळी बिडकरांनी राजकीय टोलेबाजी सुरू केली. ‘आम्ही अजिबात भेदभाव करत नाही, सर्वांना समान न्याय देतो,’ असे मिश्कीलपणे सांगत त्यांनी विरोधी पक्षनेते ड. निलेश निकम यांच्याकडे पाहून, ‘सांगा तुमच्या शहराध्यक्षांना सांगा तुमच्या वरिष्ठ नेत्यांना,’ अशी कोपरखळी मारली.दरम्यान, राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक राकेश कामटे यांच्या प्रभागातील ‘अ, ब, क, ड’ वर्गीकरणाचा उल्लेख असलेल्या निधीच्या प्रस्तावावरूनही सभागृहात चर्चा झाली. याच तांत्रिक मुद्द्यावरून दुपारी राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी आक्षेप घेतला होता. त्याच नियमाचा आधार घेत भाजपकडून राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर प्रश्न उपस्थित करण्यात आला.
या मुद्द्यावरही बिडकरांनी बालवडकरांचे थेट नाव न घेता निलेश निकम यांना उद्देशून, ‘सांगा तुमच्या पक्षातील लोकांना, आम्ही कुणावरही अन्याय करत नाही,’ असा टोला लगावला. गेल्या काही दिवसांपासून पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात पत्रांद्वारे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून भाजपच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात असताना भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. मंगळवारी मुख्य सभेत निधीच्या प्रस्तावांना मंजुरी देतानाच बिडकरांनी या राजकीय वादाचा संदर्भ घेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना अप्रत्यक्षपणे सुनावले.एकीकडे विरोधकांचे निधीविषयक प्रस्ताव मंजूर झाले, तर दुसरीकडे त्याच वेळी राजकीय टोमणे ऐकण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांवर आली. त्यामुळे मंगळवारची मुख्य सभा विकासकामांच्या प्रस्तावांपेक्षा सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक संघर्षामुळे अधिक चर्चेत राहिली.
Related
Articles
गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईटला बंदी
04 Sep 2026
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका
02 Sep 2026
प्रारूप मतदार यादी आज जाहीर होणार
31 Aug 2026
केंद्र सरकारच्या अर्जावर आज सुनावणी
01 Sep 2026
श्रीलंकेचा इंडोनेशियावर 75 धावांनी विजय
04 Sep 2026
जाहीर केलेला विकास दर योग्यच
03 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
महागाईने साखर बेचव
2
हवी किनारपट्टीवर ‘नजर’
3
महागाई ‘डाचत’ नाही..?
4
श्रीमंती आणि विषमता
5
देशातच संधी मिळावी (अग्रलेख)
6
नेपाळवर पुन्हा पुराचे संकट?