E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आवक वाढल्यामुळे झेंडू, शेवंतीच्या दरात घट
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
पुणे
: श्रावण महिन्यातील सणांमुळे ग्राहकांकडून पूजेच्या तसेच सजावटीच्या फुलांना मागणी वाढत असते. मात्र यंदा झेंडू आणि शेवंतीच्या फुलांचे उत्पादन वाढले आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत अधिक आवक होत आहे. त्यामुळे या फुलांच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे आषाढ महिन्याच्या तुलनेत या फुलांना केवळ 20 ते 30 टक्केच भाव मिळत असल्याची माहिती अखिल पुणे फुलबाजार आडते असोसिएशनचे समन्वयक सागर भोसले यांनी दिली.
दरवर्षी श्रावण महिन्यात झेंडू आणि शेवंतीला मोठी मागणी असते. त्यामुळे दरही अधिक असतात. या उलट आषाढ महिन्यात फुलांना मागणी नसते. दरही असतात. मात्र, यावर्षी परिस्थिती वेगळी आहे. लागवड वाढल्यामुळे उत्पन्नात झालेली वाढ, त्यातच शेतकर्यांनी राखून ठेवलेला अधिकच्या मालामुळे बाजारात आवक वाढली आहे. आवकच्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे झेंडू आणि शेवंतीला कवडीमोल भाव मिळत आहे.
सणामुळे घरगुती ग्राहकांसह देवस्थानच्या ठिकाणाहून फुलांना अधिक मागणी असते. त्यामुळे या महिन्यात फुले बाजारात आणण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील असतात. यंदा जिल्ह्यासह पुणे विभागात फुलांची लागवड वाढली आहे. बाजारात आवक अधिक होत आहे. पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सातारा जिल्ह्यातून फुलांची आवक वाढली आहे. बाजारात रोज सुमारे झेंडूची 25 ते 40 टन, तर शेवंतीची 15 ते 20 टन आवक झाली. अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे भिजलेला आणि दर्जाहिन माल बाजारात येत आहे. ग्राहकांकडून सुक्या मालाला मागणी आहे. सुक्या मालालाही दर कमीच मिळत आहे. दरात घट झाल्यामुळे काही वेळा वाहतूक खर्चही निघत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
मागणीत मोठी घट
यंदा विविध प्रकारच्या फुलांच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी आवक वाढली आहे. त्या तुलनेत गिर्हाईक कमी असून, फुलांना अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे दरातही घट झाली आहे.
- संतोष कुंभारकर, फुल विभागप्रमुख, पुणे बाजार समिती
घाऊक बाजारातील किलोचा दर
फुलांचा प्रकार श्रावणातील दर आषाढातील दर
झेंडू
10 ते 20 50 ते 80
शेवंती
30 ते 40 100 ते 150
Related
Articles
गती कायम राहील का? (अग्रलेख)
03 Sep 2026
बिहारमध्ये गंगेने ओलांडली धोक्याची पातळी
05 Sep 2026
दोन महिने होऊन गेले तरी कचर्याचा प्रश्न कायम
04 Sep 2026
चाईना मास्टर्सचे सात्विक-चिरागला विजेतेपद
07 Sep 2026
बळींची संख्या एक हजारावर
02 Sep 2026
यंदा एकाच दिवशी हरतालिका आणि गणेश आगमन
08 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार