E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
नैसर्गिक दगडांचा वापर करुन राख्यांची निर्मिती
Samruddhi Dhayagude
27 Aug 2026
आग्रा : आग्र्यातील कारागीर राख्यांसाठी नैसर्गिक दगडांचे तुकडे हाताने घडवून आणि त्यांना पैलू पाडून राख्यांची निर्मिती करत आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि नक्षीकामाच्या राख्यांमध्ये आणखीन भर पडली आहे. पर्यायाने नव्या पद्धतीची राखी खरेदी करण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सकुता वाढली आहे ताजमहाल आणि संगमरवरी हस्तकलेसाठी आग्रा जगात प्रसिद्ध आहे. ताजगंज भागात या नैसर्गिक दगडांचा वापर राख्यात केला जात आहे. या राख्यांमुळे सणाचे हे पारंपरिक प्रतीक एक वेगळा आणि ’प्रीमियम’ (उच्च दर्जाचा) लूक मिळत ओह.
देशभरात 28 ऑगस्ट रोजी राखी पौणिमा साजरी केली जात आहे. हस्तकला व्यापारी अदनान शेख यांनी सांगितले की, या राख्या बनवण्यासाठी ब्राझिलियन गेट, मॅलाकाइट, मदर-ऑफ-पर्ल, जॅस्पर आणि लॅपिस यांसारख्या दगडांचा वापर केला जात आहे. राख्यांना आकर्षक आणि प्रीमियम लूक देण्यासाठी विविध रंगांच्या दगडांचा वापर केला जातो. इस्रार या कारागिराने सांगितले की, एक राखी तयार करण्याच्या प्रक्रियेत अनेक कारागीर सहभागी असतात आणि प्रत्येकाकडे वेगळे काम सोपवलेले असते; त्यामुळे ही प्रक्रिया अनेकदा वेळखाऊ असते. दरम्यान, हे कारागीर आणि व्यापारी या राख्यांची विक्री ऑनलाइन माध्यमातून भारत आणि परदेशातील ग्राहकांनाही करत आहेत. या उत्पादनामुळे आग्र्याच्या हस्तकला उद्योगासाठी एक नवीन बाजारपेठ खुली होईल, अशी त्यांना आशा आहे. शेख यांनी सांगितले की, त्यांनी या वर्षी पहिल्यांदाच नैसर्गिक दगडांच्या राख्या बाजारात आणल्या आहेत, परंतु आगामी काळात त्यांना मोठी मागणी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Related
Articles
अमेरिकेचा ‘व्हिसा अटॅक’; भारतीय प्रवाशांवर परिणाम
05 Sep 2026
दुष्काळाच्या झळा, तरी बैलांवरील माया कायम, आठवडे बाजारात लगबग
07 Sep 2026
पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त डीजेमुक्त दहीहंडीचा थरार
07 Sep 2026
इंधन की अन्नसुरक्षा?
06 Sep 2026
एल-निनोच्या संकटावर जलसंधारणाचा उपाय; 34 गावांना दिलासा
04 Sep 2026
कासारवाडी, फुगेवाडीतील नागरिकांची गैरसोय दूर होणार, रेल्वे गेटऐवजी भुयारी मार्ग उभारणार
04 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार