E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पावसाळा संपत आल्यावर खड्डे बुजविण्याची लगबग
Wrutuja pandharpure
27 Aug 2026
निविदेशिवाय 16 कोटींची कामे दिल्याचा ‘आप’चा आरोप
पुणे
: दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र, पावसाळा संपत आला असतानाच खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला जाग आली असून, निविदा न काढता थेट सुमारे 16 कोटी रुपयांची कामे देण्याचा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप ‘आप’चे महाराष्ट्र प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर दहा-पंधरा दिवसांत खड्डे बुजविण्याची आश्वासने दिली जातात.
अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती कायम आहे. त्यामुळे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी अवस्था महापालिका प्रशासनाची झाली आहे,’ अशी टीका किर्दत यांनी केली.वेळेत निविदा न काढल्यामुळे पुणेकरांना पाणी तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, अपघात आणि वाहतूक कोंडी अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने झाली असती, तर सध्याची परिस्थिती टाळता आली असती, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, निविदा प्रक्रिया वेळेत न राबविण्यामागे काही नगरसेवकांना ठरावीक ठेकेदारांना कामे देण्यात रस असल्याचा आरोप किर्दत यांनी केला.
नगरसेवक, प्रशासन आणि ठेकेदार यांची हातमिळवणी
‘सत्ताधारी भाजप, सर्वपक्षीय नगरसेवक, प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात हातमिळवणी होऊन विनानिविदा कामे देण्याचा निर्णय घेतला जात आहे,’ असा आरोप किर्दत यांनी केला. पुणेकरांच्या त्रासाला सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचे सांगत, ‘पुण्यातील खड्डे हे खर्या अर्थाने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली. महापालिकेतील या कारभारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही वचक नसल्याचे या प्रकरणातून दिसून येत असल्याचा दावाही किर्दत यांनी केला.
Related
Articles
सामान्य नागरिक ते चर्चेतील चेहरा...
05 Sep 2026
सोलापूरचा गणेशोत्सव संपूर्ण डीजेमुक्त
07 Sep 2026
विमानतळावर टॅक्सी प्रवाशांची लाखोंची लूट
03 Sep 2026
असंघटित कामगारांची १५ हजार घरे तयार
08 Sep 2026
नऊ दिवस मृत्यूशी झुंज
05 Sep 2026
‘डीजे’ विरोधातला आवाज (अग्रलेख)
05 Sep 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तडजोडीनंतर दाखल गुन्हा हा कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा गैरवापर
2
विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
3
गती कायम राहील का? (अग्रलेख)
4
वाचक लिहितात
5
मोहिमेची ‘पात्रता’ (अग्रलेख)
6
दासबोेधातून शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाचा विचार